आता राहुलभाऊ फसले हो! बँकेने जारी केली आकडेवारी..
बुलढाणा दर्पणने राहुल बोंद्रे हे, अध्यक्ष किंवा संचालक असलेल्या संस्थाकडे असलेल्या कर्जाची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे मागितलेली होती. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्हा केंद्रीय सहकारी बँक बुलढाणा यांच्याकडे ती माहिती मागितली. सदर माहितीनुसार देण्यात आलेला 94 कोटी हा आकडा चुकीचा आहे , तर 31 ऑगस्ट 2024 पर्यंत राहुल बोंद्रे संचालक किंवा अध्यक्ष असलेल्या संस्थाकडे कर्जाची रक्कम 99 कोटी पेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे.बुलढाणा दर्पण आपल्या वाचकांसाठी जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने प्रसारित केलेले पत्रच या बातमीसोबत जोडत आहे.

सुज्ञ वाचकांनी आपल्या आपल्या विचारक्षमतेनुसार खरोखर शेतकऱ्यांचा तारणहार होऊ शकेल, खरोखर शेतकऱ्यांचे हित जोपासू शकेल,खरोखर शेतकऱ्यांची काळजी करणारा असा नेता कोणता असेल? याचा निर्णय स्वतः घ्यावा.



