4.2 C
New York
Thursday, April 9, 2026

Buy now

spot_img
spot_img

“ताईपण भारी देवा”……. श्वेताताईंनी मोठ्या चलाखीने केला राहुल बोन्द्रेंचा राजकीय ‘गेम’

संघर्ष मोर्चापेक्षा शेतकऱ्यांची पंप वाटपाला पसंती

चिखली: बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय कुरुक्षेत्र बनत चाललेल्या चिखली मतदारसंघात आज राजकारणाच्या कुरघोड्या पाहायला मिळाल्या.चिखली मतदारसंघात एकमेकांना मात देण्याची स्पर्धा एवढी वाढत चालली आहे की, बिग बॉस स्पर्धा त्यापुढे फिकी वाटायला लागली आहे.

चिखलीचे माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी, शेतकऱ्यांच्या काही मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष मोर्चाचे आयोजन चिखली येथे केले होते.या मोर्चाला शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे म्हणून गावा गावांमध्ये गाड्यांची व्यवस्था ही करण्यात आली होती.सोबतीला महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षातील नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले होते.प्रत्येक जातीच्या नेत्याला स्टेजवर बसवून संबंधित जातीचे कार्यकर्ते तरी मोर्चाला येतीलच,याची व्यवस्थाही करण्यात आली होती.सोबतच प्रचार प्रसारावर प्रचंड पैसा खर्च करण्यात आला.

आता दुसऱ्या बाजूने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त, राज्य पुरस्कृत एकात्मिक कपाशी, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व साखळी विकास कार्यक्रम सन 2024 -25 अंतर्गत, लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या चिखली तालुक्यातील 3000 शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड पंपाचे वाटप करण्याचा कार्यक्रमही महायुतीच्या वतीने विद्यमान आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी त्याच दिवशी, त्याच वेळी ‘मौनी बाबा संस्थान’, चिखली येथे आयोजित केला.

आता झाले असे की चिखलीत येताना शेतकरी खूप दिसले, पण शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या भाव वाढीसाठी होऊ घातलेल्या संघर्ष मोर्चा ऐवजी, पंपाचे वाटप सुरू असलेल्या ठिकाणी जाण्याला प्राधान्य दिले, त्यामुळे मोठ्या प्रयत्नाने राहुल भाऊ बोंद्रे यांनी आयोजित केलेल्या शेतकरी संघर्ष मोर्चाच्या कार्यक्रमात शेतकरी सोडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त दिसायला लागली.दोनशे गाड्यांमधून 800 शेतकरी ही जमा झाले नाही,आणि जे शेतकरी गावागावांमधून राहुल बोन्द्रे यांनी मोर्च्यासाठी गाड्या करून आणले होते, ते जाताना गाडीत पंप घेऊन चालले होते.पंप वाटपाच्या ठिकाणी शेतकऱ्यांची गर्दी मावता मावत नव्हती, तर 11 वाजता ठेवलेला शेतकरी मोर्चा दोन वाजले तरी सुरू झाला नसल्यामुळे कंटाळलेलेले शेतकरी, आपल्या गावातील पुढाऱ्यालाच शिव्या घालताना दिसत होते.

अशाप्रकारे पूर्वनियोजित असलेल्या, योग्य नियोजन करून शेतकरी संघर्ष मोर्चा काढण्याचे राहुल भाऊंचे सर्व प्लॅनिंग, श्वेताताईंनी अचानक पंप वाटप करून धुळीस मिळवल्याची चर्चा पूर्ण चिखलीत लोक चहासोबत चघळत होते.अशाप्रकारे आमदार श्वेता महाले यांनी माजी आमदार राहुल बोंद्रे यांना चांगलाच धोबीपच्छाड दिला अशी चर्चा सर्वत्र होती.

Related Articles

ताज्या बातम्या