11.5 C
New York
Friday, December 19, 2025

Buy now

spot_img
spot_img

पहिल्याच वर्षी पहिला वर्ग!जगातील पहिला ‘डायपर-विद्यार्थी’..

पहिल्याच वर्षी पहिला वर्ग!जगातील पहिला ‘डायपर-विद्यार्थी’…

उदयनगरचे ‘बाळ ब्रह्मज्ञानी’ मनोज लाहुडकर…

चिखली तालुक्यातील उदयनगर ग्रामपंचायतने इतिहास घडवला आहे. कारण या गावाने असा एक अद्भुत रत्नजडित बुद्धिमान देशाला दिला आहे की, ज्यांनी जन्माला येताच शाळेची घंटा ऐकली आणि थेट पहिल्या वर्गात प्रवेश घेतला!

होय, 1995 साली जन्मलेले, सध्या अपात्र असलेले माजी सरपंच मनोज सारंगधर लाहुडकर यांनी 1996 साली म्हणजे अवघ्या पहिल्याच वर्षी पहिल्या वर्गात प्रवेश घेतल्याची कागदपत्रे उपलब्ध आहेत.ही गोष्ट अशक्य वाटते?नाही हो… ही तर सामान्य माणसांसाठी अशक्य आहे. लाहुडकरांसाठी नाही!

ज्या वयात मुले अ, आ, इ सुद्धा ओळखत नाहीत, त्या वयात मनोज लाहुडकरांनी थेट पहिला वर्ग,वह्या-पुस्तके,शालेय रजिस्टर

आणि भविष्यातील राजकीय वाटचाल सर्व काही एकाच वेळी सांभाळले!काही अभ्यासकांचे म्हणणे आहे की,“आईच्या मांडीवर बसून अक्षरओळख करणारा हा जगातील एकमेव विद्यार्थी असावा!”

जागतिक स्तरावर आयक्यू चाचण्या घेतल्या जातात, पण लाहुडकर प्रकरणात त्या निरुपयोगी ठरतात.कारण —जागतिक बुद्धिमत्ता यादीत नाव नोंदवण्यासाठी परीक्षा नाही,तर जन्मतारीख बदलण्याची कला लागते!पहिल्याच वर्षी पहिल्या वर्गात प्रवेश म्हणजे ही साधी गोष्ट नसून काल-गणितालाच छेद देणारी विद्या आहे.

अशा अद्भुत बुद्धिमत्तेचा उपयोग केवळ सरपंचपदापुरता मर्यादित ठेवणे हा देशावर अन्याय ठरेल.कारण जे बाळ वयाच्या पहिल्या वर्षी शाळेत जाऊ शकते, त्यांना इसरो नासा अशा मोठ्या संघटनेमध्ये मोठ्या पदावर बसवणे गरजेचे आहे..

Related Articles

ताज्या बातम्या