प्रभाग क्रमांक आठमध्ये सुहास शेटे यांना जनतेचा वाढता पाठिंबा….
विकासाचा वादा, सरळ साधा, सुहास दादा…
चिखली शहरातील सरळ, विनम्र आणि लोकसंग्रहात अग्रस्थानी असलेले सुहास शेटे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून मिळालेले संस्कार, रामकृष्ण दादांच्या मार्गदर्शनाची पुण्याई आणि सर्व स्तरातील लोकांशी अढळ नातं यामुळे सुहास शेटे यांची प्रतिमा चिखलीत ‘दादा’ म्हणून रुजली आहे.
माजी नगराध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी साधेपणा, प्रामाणिकपणा आणि विकासाभिमुख दृष्टिकोन दाखवला. आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ते मुख्य स्पर्धक मानले जात होते. मात्र पक्षाने जेष्ठ नेते पंडित दादा देशमुख यांना उमेदवारी दिल्यानंतर सुहास शेटे यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना मनापासून शुभेच्छा देत पक्षाच्या निर्णयाला विनम्रतेने मान दिला. त्यांच्या या मोठ्या मनाच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आता सुहास शेटे प्रभाग क्रमांक आठमधून नगरसेवक पदासाठी उभे आहेत. प्रामाणिक, कार्यतत्पर आणि समाजाशी घट्ट नाळ असलेला उमेदवार म्हणून त्यांची ओळख अधिक दृढ होत आहे. त्यांच्या साध्या स्वभावामुळे आणि लोकांमधील लोकप्रियतेमुळे प्रभाग क्रमांक आठमधील मतदार त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देतील, असा ठाम विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
चिखली शहरात सुहास शेटे यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक रंगतदार होण्याचे संकेत मिळत असून, त्यांना मिळणारा वाढता पाठिंबा स्पष्टपणे जनमानसात दिसून येत आहे.



