30.6 C
New York
Sunday, June 14, 2026

Buy now

spot_img
spot_img

“सर्वांसाठी निरोगी चिखली” व आरोग्यदायी चिखलीचे स्वप्न… डॉ. संध्या कोठारी

“सर्वांसाठी निरोगी चिखली” व आरोग्यदायी चिखलीचे स्वप्न… डॉ. संध्या कोठारी

चिखली शहराचे आरोग्य हेच सर्वात मोठी संपत्ती मानत डॉ. सौ. संध्या कोठारी यांनी नागरिकांच्या आरोग्यासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

शहरातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, सुगम आणि नागरिकाभिमुख व्हावी, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांना आधुनिक सुविधा पुरवणे व नियमित आरोग्य तपासणी शिबिरे सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.

डॉ. कोठारी म्हणाल्या, “आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या प्रेरणेतून चिखली शहराला अत्याधुनिक आरोग्यसेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमदार श्वेता महाले यांनी ग्रामीण रुग्णालयाचा कायापालट केला असून, डायलिसिस, सोनोग्राफी, गर्भाशय मुखाचा कॅन्सर प्रतिबंधक लस वितरण, रेडिओलॉजीसारख्या सेवा उपलब्ध करून दिल्या. त्या विकासाच्या दृष्टिकोनाला आता तंत्रज्ञानाची व आधुनिकतेची जोड देऊन शहरातील आरोग्यसेवा आणखी सक्षम करण्याचे माझे ध्येय आहे.”

आमदार श्वेता महाले यांच्या प्रयत्नातून चिखलीतील आरोग्यसेवा जिल्ह्यात आदर्श ठरली आहे. त्यात डॉक्टर संध्या कोठारी आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि लोकसहभागाच्या माध्यमातून नवीन ऊर्जा ओतणार आहेत.त्यांच्या नेतृत्वाखाली “सर्वांसाठी निरोगी चिखली” हे स्वप्न साकार करण्याचे ध्येय त्यांनी मांडले असून, चिखली शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा दृढ निश्चय त्यांनी व्यक्त केला आहे….

Related Articles

ताज्या बातम्या