12.8 C
New York
Monday, April 13, 2026

Buy now

spot_img
spot_img

चिखली नगराध्यक्ष पदासाठी डॉ. संध्या कोठारी – महिलांच्या अपेक्षांची आदर्श उमेदवार

चिखली नगराध्यक्ष पदासाठी डॉ. संध्या कोठारी – महिलांच्या अपेक्षांची आदर्श उमेदवार

प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.संध्या विजयकुमार कोठारी या केवळ वैद्यकीय क्षेत्रात नव्हे तर सामाजिक कार्यातही अग्रस्थानी राहिलेल्या आहेत. काल त्यांनी चिखली शहरातील गांधीनगर व परिसरातील नागरिकांशी भेटीगाठी घेतल्या, यावेळी महिलांमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड उत्साह व आत्मीयता दिसून आली.

डॉ.कोठारी या गेल्या अनेक वर्षांपासून महिलांच्या आरोग्यविषयक तसेच सामाजिक समस्यांवर सातत्याने काम करत असून, स्त्रियांच्या दैनंदिन अडचणी, आरोग्यविषयक अडथळे, शिक्षण आणि स्वावलंबनाच्या गरजा यांची त्यांना सखोल जाण आहे. त्यांनी विविध उपक्रमांद्वारे महिलांना आरोग्य, स्वच्छता, तसेच आत्मनिर्भरतेबाबत मार्गदर्शन केले आहे.

चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागील सहा वर्षांमध्ये चिखलीत झालेल्या सर्वांगीण विकासाची पावले दृढ होत असताना, त्या विकासाच्या बरोबरीने शहरात संवेदनशील व लोकाभिमुख नेतृत्वाची गरज असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर, डॉ. संध्या कोठारी या नगरपरिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष पदासाठी सर्वात योग्य, सुशिक्षित आणि संवेदनशील उमेदवार म्हणून पुढे येत आहेत…..

Related Articles

ताज्या बातम्या