चिखलीच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्व — डॉ. संध्या कोठारी नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी योग्य व सक्षम उमेदवार..
आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या प्रेरणेतून महिला नेतृत्वाचा उदय….
चिखली शहरात सध्या विकासाच्या नव्या वाटा खुल्या होत आहेत. मागील सहा वर्षांपासून चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी केलेल्या सर्वांगीण विकासकामांचा ठसा जनतेच्या मनावर उमटला आहे. महिला आमदार म्हणून त्यांनी शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, उद्योग व महिला सक्षमीकरण या सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या कार्याचा आदर्श घेऊन आता शहरातील महिलांमध्येही नेतृत्वाची नवी ऊर्जा निर्माण झाली असून, या प्रवाहात डॉ. संध्या कोठारी यांचे नाव अग्रस्थानी आहे.
डॉ. संध्या कोठारी या प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ असून वैद्यकीय क्षेत्रातील तब्बल ४० वर्षांचा अनुभव त्यांना आहे. त्यांनी आपल्या दीर्घ सेवाकाळात सर्वसामान्य जनता, गोर-गरीब आणि वंचित घटकांच्या आरोग्यसेवेसाठी अतिशय मनापासून काम केले आहे. रुग्णांच्या सेवेत त्यांनी नेहमी माणुसकी जपली असून, त्यांच्याशी जोडलेले भावनिक नातेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे वैशिष्ट्य आहे.
आज त्या चिखली नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी उत्सुक असून “सेवेतून नेतृत्व” हीच त्यांची ओळख बनली आहे. त्यांचा समृद्ध अनुभव, जनतेशी असलेला आत्मीय संबंध आणि विकासाकडे बघण्याची व्यावहारिक दृष्टी हे त्यांना योग्य उमेदवार बनवते.
आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी मागील काळात शहर व ग्रामीण भागाच्या विकासासाठी घेतलेल्या पुढाकारांचा डॉ. कोठारी यांना ठोस प्रेरणास्त्रोत लाभला आहे. महिला नेतृत्वाने विकासाच्या आघाडीवर कसे प्रभावीपणे कार्य करावे याचे उत्कृष्ट उदाहरण आमदार महाले पाटील यांनी घालून दिले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. कोठारी यांच्या उमेदवारीकडे शहरवासीय मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत.
आरोग्य सेवा, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम त्यांच्या कार्यातून दिसून येतो. त्यांच्या नेतृत्वाखाली चिखली शहर अधिक सुशोभित, सुसंस्कृत आणि नागरिककेंद्री बनू शकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
“विकास आणि जनसेवेची परंपरा पुढे नेणारे नेतृत्व म्हणजेच डॉ. संध्या कोठारी,” असे मत स्थानिक नागरिक व महिला संघटनांकडून व्यक्त होत आहे…



