“संघ मातृसंस्था, संघ मार्गदर्शक… पण चारित्र्यहीन लोकांना संघापासून दूर ठेवण्याची गरज…
चिखलीमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजकीय भूमिकेबद्दल काल एका पोर्टल ने आपले मत प्रदर्शित केले होते. चिखलीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजकीय भूमिकेबद्दल मतमतांतरे असू शकतात. परंतु आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी कोणाचे तरी पाय चाटणारे आणि कोणाला तरी ब्लॅकमेल करणारे, वर स्वतःला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणवून घेणारी चार टाळकी म्हणजे संघ नव्हे. संस्कारहीन व चारित्र्यहीन असलेले काही लोक रा. स्व. संघाचा वापर पक्षीय राजकारण करणाऱ्या लोकांना ब्लॅकमेल करून दोन्ही पक्षांकडून आपली तुंबडी भरून घेण्यासाठी नक्कीच करत आहेत, हि बाब विधानसभा निवडणुकीमध्ये तमाम चिखलीकरांना कळली आहे.
तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्र प्रथम हीच भावना दृढ करतो आणि देशासाठी समर्पणाचीच प्रेरणा देतो.आपत्ती, पूर, भूकंप, महामारी यांसारख्या संकटांमध्ये संघाचे स्वयंसेवक तत्परतेने मदत कार्य करतात. तरुणांमध्ये चारित्र्य, नीतिमत्ता, सेवाभाव आणि सांस्कृतिक मूल्ये रुजवण्याचे कार्य संघ करतो. मोठ्या संख्येने लोकांना एकत्र आणून कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक किंवा राष्ट्रीय कार्यात प्रभावी सहभाग घडवून आणण्याची क्षमता संघात आहे.
संघाचा व संघाच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या मूर्ख व्यसनी लोकांमुळे संघाची व्यर्थ बदनामी करण्याची संधी काही लोकांना आपसूक मिळत आहे. तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जुन्या,जाणत्या आणि खऱ्या व प्रामाणिक लोकांनी,चारित्र्यहीन लोकांना या मातृसंस्थेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, त्याचप्रमाणे कोणत्याही संस्कारी पक्षामध्ये असल्या संस्कारहीन लोकांना कुठल्याच कार्यकारणी मध्ये स्थान मिळायला नको होते परंतु दुर्दैवाने अशा लोकांना अजाणतेपणाने का होईना वाव दिल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या पवित्र संघटनाचे नाव देखील खराब होत आहे….



