मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये ‘दिक्षारंभ’ समारोह संपन्न…
बुलढाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये २० ऑगस्टला दीक्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी अनिल अकाळ,अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक श्री अमोल गायकवाड, उपशिक्षणाधिकारी आशिष वाघ, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक अण्णासाहेब म्हळसणे आणि प्रा कीसन वाघ व्यासपिठावर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षाणाधिकारी बोलत होते ते पुढे म्हणाले की, महाविद्यालयीन दशेतील पहिले पाऊल हे युवकांसाठी भविष्य घडविणारे किंवा भविष्य बिघडविणारे असते, तेव्हा युवकांनी महाविद्यालयीन काळामध्ये जिद्द मेहनत आणि परिश्रम करून शैक्षणिक यश संपादन करून आपलं आयुष्य सुखमय व समृद्ध करावे. असे आवाहन त्यांनी केले
शालेय दशेत केलेल्या अभ्यासक्रमांचा फायदा स्पर्धा परिक्षेच्या तयारीत होतो, तेव्हा मन लावून अभ्यास करा अस आवाहन अनिल अकाळ यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन करतांना केले
या कार्यक्रमाला च्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीपर शपथ देण्यात आली,शाळकरी विद्यार्थ्यांनी नशामुक्त राहून चांगले व्यक्तिमत्व घडविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक श्री अमोल गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर विद्यापीठ गीत सादर करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गुलाबराव सोनोने यांनी करून दीक्षारंभ कार्यक्रमाचे महत्त्व समजून सांगितले, तर अध्यक्षीय भाषणामध्ये मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक अण्णासाहेब म्हळसणे यांनी विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी नियमित अभ्यास करणे गरजेचे आहे असा सल्ला यावेळी दिला
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रा. प्रेरणा पाटील, प्रा. अर्चना पाटील, प्रा.सौ. नाफडे, प्रा. किशोर बुलकडे, प्रा. दीपक देशमुख यांनी मेहनत घेतली सूत्रसंचालन प्रा. विनकर तर आभार प्रदर्शन प्रा. सागर ढोणे यांनी केलं या कार्यक्रमाला मॉडेल डिग्री कॉलेजमधील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



