24 C
New York
Wednesday, August 19, 2026

Buy now

spot_img
spot_img

सहकार विद्या मंदीर,मोताळा यांच्या शिरपेचात आणखी एक “मानाचा तुरा”..

सहकार विद्या मंदीर,मोताळा येथील विद्यार्थ्यांची शालेय रस्सीखेच स्पर्धेत १७ वर्ष वयोगट व १४ वर्ष वयोगटात विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करून राज्यस्तरावर निवड

श्री शिवाजी विद्यालय,राजंदा,ता. बार्शीटाकळी जि. अकोला येथे दिनांक २४ जानेवारी २०२४ रोजी संपन्न झालेल्या शालेय विभागीय स्तर रस्सीखेच अजिंक्यपद स्पर्धेमध्ये अमरावती विभागामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सहकार विद्या मंदिर,मोताळा यांनी १७ वर्ष वयोगट व १४ वर्ष वयोगट मुले गटामध्ये विजेतेपद मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला.सदर स्पर्धेसाठी शाळेचे क्रिडा प्रशिक्षक श्री.उमेश माळी सर यांनी योग्य मार्गदर्शन करून मुलांकडून परिश्रम करुन घेवून विजय मिळविला.

बुलडाणा अर्बन परिवाराचे संस्थापक-अध्यक्ष आदरणीय राधेश्यामजी चांडक (भाईजी), मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुकेशजी झंवर तसेच संस्थेच्या अध्यक्षा सौ.कोमलताई झंवर,यांनी या यशस्वी विद्यार्थी यांचे विशेष कौतूक करून बुलढाणा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी यांच्यात क्रिडा क्षेत्रातील स्पर्धा विषयक खिलाडी वृत्ती मूल्यांचे रुजवणूक व संवर्धन करण्यासाठी सहकार विद्या मंदिर समूह हा विद्यार्थी वर्गाच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी सदैव कटिबद्ध असेल असे प्रतिपादन केले.

सहकार विद्या मंदीर,मोताळाचे मुख्याध्यापक श्री.अभिजित देशमुख सरांनी सहभागी विद्यार्थ्यांचे व क्रिडा प्रशिक्षकांचे कौतुक केले. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मुलांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

ताज्या बातम्या