20.4 C
New York
Sunday, June 21, 2026

Buy now

spot_img
spot_img

कॉपीमुक्तीच्या दिशेने आणखी एक पाऊल…मुख्य कार्यकारी अधिकारी करणार कॉपीमुक्त बुलढाणा.?

कॉपीमुक्तीच्या दिशेने आणखी एक पाऊल…मुख्य कार्यकारी अधिकारी करणार कॉपीमुक्त बुलढाणा.?

एक सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून कॉपिसेंटर म्हणून प्रसिद्ध असलेल्या बुलढाणा जिल्हा व परिसरातील व विशेषतः ग्रामीण भागातील कॉपिसेंटर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कनिष्ठ महाविद्यालय व त्यातील कॉपी पुरवणारे “कलंक शिक्षक” यांचा नावानीशी भांडाफोड करणार असल्याची व संबंधित सर्व बाबींची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी व जी. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन ही देणार असल्याची बातमी बुलढाणा दर्पण ने दिली होती.या कार्याचा पुढील भाग म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी,बुलढाणा यांना यासंबंधी निवेदन देण्यात आले असून यावर मुख्य कार्यकारी अधिकारी काय कृती करतात याकडे लक्ष लागून आहे.

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये कॉपिसेंटर चा संपूर्ण खेळ कशाप्रकारे अर्थकारणावर अवलंबुन असून त्यामध्ये विद्यार्थी व कुटुंबीय यांचे आयुष्य नासवणे करिता काही संस्था व संस्थेतील शिक्षकी पेशातील कलंक कशा प्रकारे हा खेळ चालवतात व त्यातून “तीस मुले बसण्याची सोय नसलेल्या महाविद्यालयात कशाप्रकारे दोनशे पेक्षा जास्त प्रवेश करून घेतले जातात” याचा उहापोह केला आहे. आता प्रात्यक्षिक परीक्षेच्या नावावर पुन्हा काही विषय शिक्षकांची दुकानदारी सुरु होईल त्याकडे व अंतिम परीक्षेकडे लक्ष देण्याची गरज मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या