20.4 C
New York
Sunday, June 21, 2026

Buy now

spot_img
spot_img

रखडलेल्या पीकविम्याचे २३३ कोटी शेतकर्‍यांना तातडीने वाटप करा!….. विनायक सरनाईक.

रखडलेल्या पीकविम्याचे २३३ कोटी शेतकर्‍यांना तातडीने वाटप करा!

– शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी घेतली कॅबिनेट मंत्री आकाश फुंडकर यांची भेट

– नामदार आकाश फुंडकर, आमदार महाले यांचे स्वागत करीत मांडल्या शेतकरीहिताच्या मागण्या…

नागपूर/चिखली – क्रांतीकारी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी नागपुरात राज्याचे कॅबिनेट मंत्री आकाश फुंडकर यांच्यासह चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील, यांचे अभिनंदन करून, शेतकरीहिताच्या मागण्या त्यांच्यापुढे मांडल्या. मागील वर्षीच्या जिल्ह्यातील रखडलेल्या पीकविम्याचे २३३ कोटी रूपये तातडीने शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावे, व पीकविमा वाटपातील अनागोंदी दूर करून पीकविम्या पोटीचा राज्य सरकारचा हिस्सा तातडीने द्यावा व शेतकर्‍यांचे पैसे हडपणार्‍या पीकविमा कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी सरनाईक यांनी याप्रसंगी केली.

जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांची खरीप व रब्बी मिळून मागील वर्षीची म्हणजेच सन २०२३ ची २३३ कोटी रूपयांची रक्कम राज्य शासनाने दिली नसल्याने ती हिस्याची रखडून पडलेली विमा रक्कम शासनाने अदा करावी, राज्य शासनाकडे रखडलेला सन २०२३चा २३३ कोटी रूपयांटा हिस्सा रक्कम विमा कंपनीला देत पीकविमा शेतकर्‍यांना देण्यात यावा, अशी मागणी विनायक सरनाईक यांनी आकाश फुंडकर यांच्याकडे नागपूर येथील शासकीय निवासस्थानी केली. तर भाऊसाहेब फुंडकर कृषीमंत्री असतांना त्यांनी कृषीक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या अडचणी नियमीत सोडवल्याचे सांगत, भाऊसाहेब उपाख्य पांडुरंगजी फुंडकर कृषीमंत्री असतांना त्यांच्या व सदाभाऊ खोत कृषी राज्यमंत्री असतांना दोघांच्या माध्यमातून त्यावेळी आम्ही शेतकर्‍यांचे अनेक प्रश्न मार्गी लावू शकलो होतो, तर आकाशदादासुद्धा भाऊ साहेबांप्रमाणेच शेतकर्‍यांना न्याय देतील, अशी अपेक्षा विनायक सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे शेतकर्‍यांची सन २०२३ची खरीप व रब्बीची रखडलेली पीकविमा रक्कम अदा करण्यात यावी, शेतकर्‍यांचे कृषी विभागाकडे रखडून पडलेले कृषी औजारांचे अनुदान अदा करण्यात यावे, पीकविमा कंपनीला केंद्र शासनाकडून मिळालेली, राज्य शासनाकडून मिळालेली व शेतकर्‍यांची हिस्सा रक्कम आणि यापैकी झालेल्या वाटपात तफावत असल्याचे म्हणत, या प्रश्नाकडे जिल्ह्यातील आमदार व मंत्र्यांनी लक्ष घालावे, या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. पीकविमा प्रश्नी व शेतकर्‍यांच्या विविध मागण्या सरनाईक यांनी आमदार श्वेताताई महाले, आ. मनोज कायंदे यांच्यासह विविध आमदारांकडे केल्या आहेत. तर या अधिवेशनात राज्य शासनाकडील पीकविम्याची उर्वरित हिस्सा रक्कम मिळण्यासाठी निर्णय होईस, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना लागली आहे.

जिल्ह्यातील मंत्र्यासह आमदारांनी पीकविमा प्रश्न लावून धरावा – विनायक सरनाईक

शेतकर्‍यांची सन २०२३ची सोयाबीन व हरभरा पीकविम्याची रक्कम राज्य शासनाने दुसर्‍या टप्यातील हिस्सा रक्कम दिली नसल्याने रखडून पडली आहे. तर निवडणूक काळात उर्वरित शेतकर्‍यांची रक्कम अदा करू, असा शब्द नेत्यांकडून अनेक वेळा देण्यात आला होता. परंतु, निवडणूक झाल्यानंतर पीकविमा प्रश्नावर शेतकरी नेते रविकांत तुपकर व शेतकरी संघटना सोडल्या तर कुणीही बोलायला तयार नसल्याचे दिसून आले. या अधिवेशनात जिल्ह्यातील आमदारांनी रखडलेल्या २०२३ व २०२४ च्या पीकविम्याचा प्रश्न लावून धरावा व शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांसह विनायक सरनाईक यांनी केली आहे.

जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला पीकविमा कंपनी विरोधात तक्रारी

इतर जिल्ह्यांत पीकविमा कंपनीने फसवणूक केल्या प्रकरणी कंपनीवर गुन्हे दाखल असल्याचे दाखले देत, आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकर्‍यांसह आक्रमक पावित्रा घेत शेतकरी नेते विनायक सरनाईक, नितीन राजपूत, टाले यांनी जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला शेतकर्‍यांच्या नावाने फिर्याद दाखल केल्या आहेत. विशेष म्हणजे, पीकविमा कंपनीने दिरंगाई करणे, टाळाटाळ करणे व तफावतीचा घोळ यावर नियमानुसार व राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार चौकशी झाल्यास गुन्हेसुद्धा दाखल होऊ शकतात. परंतु, या प्रकरणी कृषी विभागाकडे हजारो तक्रारी असतांना आणि पोलिस स्टेशनला तक्रारी दाखल असतांना गुन्हे दाखल होणे तर सोडाच साधी चौकशीदेखील शेतकर्‍यांच्या तक्रारीवरून झाली नसल्याने या पीकविमा कंपन्यांना कुणाचे अभय आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या