शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांच्या गाडीने युवकाचा मृत्यू…
“ओमसिंग राजपूत” यांचे हिट अँड रन प्रकरण?
अजिंठा बुलढाणा रोडवर झालेल्या एका अपघातामध्ये धावडा येथील दिलीप सांणसे नामक युवकाचा अपघाती मृत्यू झाला असून,या अपघातामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदार संजय गायकवाड यांचे खास असलेले ओमसिंग राजपूत यांचे वाहन युवकाला भरधाव वेगाने उडवून समोर जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून येत आहे.
या अपघातामध्ये दिसून येत असलेले वाहन जरी माझे असले तरी मी गाडीमध्ये नव्हतो असे शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांनी सांगितले आहे.आपल्या तौफिक नामक ड्रायव्हरला पाहुण्यांना आणण्यासाठी आपण पाठवले होते असे ते म्हणाले.
शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांच्या मोबाईल लोकेशन वरून आणी पोलीस खरोखर किती खोल तपास करतात यावरून ओमसिंग यांचा गुन्हा आहे की नाही हे नंतर सिद्ध होईलच. परंतु मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीच्या वाहनाने कुणाचा अपघात झाल्यानंतर जॉली एलएलबी या सिनेमाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.मोठ्या पदावरील व्यक्ती संकटात अडकला म्हणजे ती “बातमी” होते आणी न्यायव्यवस्थेला डावलुन बाहेर मीडिया ट्रायल्स सुरु होतात.हे टाळणे गरजेचे असले तरीही
आज ओमसिंग राजपूत म्हणत असल्याप्रमाणे ड्रायव्हर “तौफिक” होता कालांतराने ही गाडी ओमसिंग राजपूत यांच्या नावावर आहे की नाही? हेही कळेलच फक्त दुर्दैवी मृत्यू झालेल्या दिलीपची ती गोंडस लहान मुलगी आणी त्याच्या परिवाराला दिलीपची उणीव कुणी आणी कशी भरून काढायची? हे जरा कठीण आहे.
यामध्ये श्री ओमसिंग राजपूत यांनी मृतक दिलीप यांच्या परिवाराविषयी तीव्र संवेदना व्यक्त केल्या असून मृत दिलीप याच्या कुटुंबाला योग्य न्याय मिळण्यासाठी देखील ओमसिंग राजपूत प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे.



