4.2 C
New York
Thursday, April 9, 2026

Buy now

spot_img
spot_img

सेवासंकल्प कडून सौ. मेघा पालवे यांना मानहानीची नोटीस जारी… माफी मांगा अन्यथा खटल्याला सामोरे जा… सौ आरती पालवे.

सेवासंकल्प कडून सौ. मेघा पालवे यांना मानहानीची नोटीस जारी…

माफी मांगा अन्यथा खटल्याला सामोरे जा… सौ आरती पालवे.

चिखली:  काही दिवसांपूर्वी सौ मेघा सागर पालवे यांनी सागर पालवे व त्यांचे दीर डॉक्टर नंदकुमार ज्ञानेश्वर पालवे यांच्यासह घरातील काही जणांवर घरघुती हिंसाचाराचे आरोप केले होते.या आरोपासॊबतच सौ. मेघा सागर पालवे यांनी “सेवासंकल्प” या सेवाभावी विनाअनुदानीत संस्थेवर अतिशय गंभीर आरोप केले होते. त्यांनी वैयक्तिक केलेल्या आरोपांना कोणतेही उत्तर न देता शांत बसलेल्या पालवे कुटुंबीयांनी सेवा संकल्प या संस्थेवर केलेल्या आरोपाबद्दल मात्र कायदेशीर मार्गाची निवड केली आहे. सेवा संकल्प या संस्थेच्या अध्यक्षा सौ आरती नंदकुमार पालवे यांनी एडवोकेट ढवळे यांचे मार्फत सौ मेघा सागर पालवे यांना मानहानीची खटला दाखल करण्यापूर्वी पूर्वसूचना म्हणून एक नोटीस जाहीर केली असून सौ. मेघा यांनी नोटीस मिळाल्यानंतर सात दिवसाच्या आत माफी न मागितल्यास त्यांचेवर मानहानीचा खटला दाखल करण्याची सूचना दिली आहे. त्यांनी पाठवलेल्या नोटीसचा प्रमुख व महत्वाचा भाग खालीलप्रमाणे.

लोकसहभागातून चालणाऱ्या सेवासंकल्प प्रकल्पाचा खर्च अवाढव्य आहे. प्रकल्पाला मिळणारी रसद तसूभर हि कमी झाल्यास त्याचा विघातक परिणाम संस्थेतील उपचार घेत असलेल्‌या माता बांधवांवर होऊ शकतो याची संपूर्ण कल्पना असतांना या कुटुंबाला छळण्यासाठी आपण हा अघोरी मार्ग अवलंबला आहे असे प्रथमदर्शनी दिसून येते. प्रकल्पाला बदनाम करण्याचा सुनियोजित कट आपण व आपल्या परिवाराने रचून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

5) आपण वृत्तपत्रामध्ये सेवासंकल्प प्रकल्पा विषयी केलेल्या खोट्या व तथ्यहीन तसेच समाजाची दिशाभूल करणाऱ्या वक्तव्याचे प्रकल्पावर गंभीर स्वरूपाचे परिणाम होणार आहेत. त्यामुळे आपण सेवा संकल्प प्रतिष्ठान या संस्थेची मानहानी केल्याने संस्थेला होणाऱ्या संभाव्य नुकसानाची भरपाई करण्याची कायदेशीर जवाबदारी आपण नोटीस घेणार यांची आहे.

सेवा संकल्प प्रकल्पातील रुग्ण माता बांधवांचा खर्च खालील प्रमाणे आहे.

प्रत्येकी एका माता बांधवाच्या एक वेळच्या जेवणाचा खर्च रु. 50 असे दोन वेळचे मिळून 100 रु. एका रुग्णाच्या रोजच्या औषधोपचारा करिता लागणारा सरासरी वैद्यकीय खर्च रु. 50 तसेच रुग्णाची रोजची सुश्रुषा, दाढी कटिंग व इतर बाबींसाठी रु.50 असे एकूण प्रत्येकी रुग्ण रोजचा खर्च हा रु.200 इतका आहे. त्यामुळे सर्व माता बांधवाना दिवसाला रु.48,000 इतका खर्च येतो.

त्यामुळे संस्थेला वर्षाला एकूण 2कोटी इतका खर्च माता बांधवांवर करावा लागपडेल. सर्व खर्च कुठल्याही शासकीय अनुदाना शिवाय करावा लागतो. वरील खर्च जरी 240 रुग्णांचा असला तरी आता पर्यंतचा अनुभव लक्षात घेता हा आकडा सतत वाढत असतो त्यामुळे संस्थेस लागणारा खर्च त्या पटींनी वाढू शकतो याची नोंद आपण नोटीस घेणार यांनी घ्यावी.

कौटुंबिक प्रकरणाला सार्वजनिक रूप देऊन एका आदर्श सार्वजनिक चळवळीला बदनाम करण्याचे अतिशय घाणेरडे षड्यंत्र आपण रचलेले आहे. त्यामुळे आपण भारतीय न्याय संहितेचे कलम 356 नुसार संस्थेची मानहानी करून कायद्यानुसार दंडनीय कृत्य केले आहे. करिता हि नोटीस प्राप्त झाले पासून 7 दिवसांचे आत संस्थेची जाहीर माफी मागावी, अन्यथा संस्थेला आपले विरुद्ध न्यायालया मध्ये मानहानीचे प्रकरण दाखल करणे भाग पडेल.

Related Articles

ताज्या बातम्या