4.2 C
New York
Thursday, April 9, 2026

Buy now

spot_img
spot_img

स्वतःच्या गावात बत्तीस मते….. प्रशांत ढोरे यांनी केलेले आरोप मात्र “तेहतीस”…

राज्यभरातील विधानसभा निवडणुका पार पडल्या.बरेच अनपेक्षित निकालही लागले.चिखली विधानसभा मतदारसंघातही अनपेक्षित निकाल लागायची शक्यता बरीच वाढली होती परंतु आमदार श्वेताताई महाले यांच्या “विकासाने” अखेर माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या “भय व भ्रष्टाचार ” यावर मात केली.

आमदार श्वेताताई महाले यांचा विजय अपेक्षेपेक्षा खूप कमी मतांनी, खूप कमी फरकाने झाला.पण विजय होने महत्वाचे! आता पराभूत उमेदवारांनी त्यांच्या पराभवाचे परीक्षण सुरु केल्यामुळे आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरु झाले आहे. चिखली विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने प्रमुख दोन पक्षांना मत देणे योग्य ठरवले आणि मनसे व इतर अपक्ष यांना अतिशय लाजिरवाणी मते मिळाली.

पान्हा या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार प्रशांत ढोरे पाटील यांना मिळालेल्या मतापेक्षा “त्यांच्या टिळ्याच्या कार्यक्रमाला याच्यापेक्षा जास्त गर्दी होती ” थोडक्यात त्यांच्या अगदी जवळच्या नातेवाईकांनी देखील त्यांना मत दिले नाही. असे विनोदी सूर त्यांचे माजी सहकारी काढत आहेत.

प्रशांत ढोरे यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार राहुल बोंद्रे यांची सुपारी घेऊन आपल्या गावासकट इतर गावातही राहुल बोंद्रे यांचा प्रचार केला असा आरोप त्यांच्यावर होत आहे.आणि त्यांच्या स्वतःच्या गावातून त्यांना फक्त 32 मते मिळाली व राहुल बोंद्रे यांना 800 च्या वर मते मिळाली.ही आकडेवारी पाहून या आरोपात बरेचशे तथ्यही वाटत आहे.लोकसभा निवडणुकीत पान्ह्याला झालेले मतदान हे चिन्हाला झालेले मतदान नसून रविकांत तुपकर यांची ती जादु होती असाच काही अनुभव चिखली विधानसभा निवडणुकीत आला कारण प्रशांत ढोरे यांचे निवडणूक चिन्हदेखील पान्हा होते.पण पान्ह्याने हाताला मदत झाली आणी प्रशांत ढोरे अपेक्षेपेक्षा खूप जास्त जोराने आपटले.

आपल्या पराभवाचे परीक्षण करताना प्रशांत ढोरे म्हणाले की, शेतकरी चळवळीतील काही “सुपारीबाज लोकांनी” आपल्याला मते मिळू नयेत म्हणून आपल्या विरुद्ध आपल्या परिसरामध्ये प्रचार केला.काहीही कारण नसताना काही पत्रके छापून आणली. शेतकरी म्हणून मला मदत करण्याऐवजी शेतकरी संघटनेतीलच “अंध भक्तांनी” संघटनेचे बिल्ले लावून माझ्याविरुद्ध लोकांचे कान फुकले.

प्रशांत ढोरे यांनी सांगली वार्ता नावाच्या एका दैनिकात आपल्याला मते न मिळाल्याबद्दल अनेक आरोप केलेले असले तरी शेतकरी संघटने कडून “त्यांना मते बत्तीस असून त्यांनी आरोप मात्र तेहतीस ” केले आहेत अशी खिल्ली उडवली जात आहे.यावर त्यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे आवश्यक आहे.

Related Articles

ताज्या बातम्या