चिखली मतदारसंघ सुंदर बनविण्याची गोष्ट: भाग ४ (उज्ज्वल भविष्य)
घरातील स्त्री जेंव्हा घर सांभाळत असते…तेंव्हा तिच्या संवेदनशील मनात घरासाठी आणि घरातील माणसांच्या भविष्यातील सुखसोयींसाठी…मनाशी काही स्वप्न असतात…काही उद्देश असतात… आणि त्यासाठी त्या स्रीचे सतत प्रयत्न सुरू असतात…
त्याच पध्दतीने मतदार संघ आपलं घर मानून…एक स्री आमदार म्हणून त्याच संवेदनशील मनाने रणरागिणी आमदार सौ.श्वेताताई… मतदार संघातील जनतेला भविष्यातील सुखसोयी मिळाव्यात यासाठी सतत प्रयत्नशील असतात.
घरातील स्त्रीला घर सांभाळतांना दैनंदिन जीवनात पाणी फार आवश्यक आहे…तर तेच पाणी चिखली शहरातील जनतेला रोज एक दिवसा आड मिळावे यासाठी सौ.श्वेताताईंच्या पुढाकाराने १५० कोटी रुपयांची योजना मंजूर झालेली आहे.आणि येणाऱ्या भविष्यात ती लवकरच कार्यान्वित पण होणार आहे… चिखली शहरातील हि एक मुख्य…पाणी समस्या ओळखून भविष्यात त्या बाबतीत चिखली शहरातील जनतेला सोय करण्याचा विचार फक्त एका संवेदनशील स्री मनातच येऊ शकतो…आणि असं म्हणतात,*”एक स्रीच दुसऱ्या स्त्रीच्या वेदना समजु शकते…”* तर चिखली शहरातील महिला मतदारांबद्दल हि जाण आणि संवेदनशीलता आज आमदार सौ.श्वेताताई महाले यांनी १५० कोटी रूपयांची नळ योजना मंजूर करुन दाखविली आहे…
घरातील स्रीला नेहमीच वाटत असतं कि आपलं घर सुंदर असलं पाहिजे…आणि एखादं शहर सुंदर त्याचवेळेस वाटतं… ज्यावेळेस त्या शहरामध्ये एखादं सुंदर उद्यान असते…आज जर चिखली शहरामध्ये आपल्याला आपल्या कुटुंबासोबत आयुष्यातील काही विरंगुळ्याचे क्षण साजरे करण्यात घालविण्याचे असतील…तर एकही सुंदर असं उद्यान उपलब्ध नाही… आणि हिच गरज ओळखून… चिखली शहर आणि चिखली मतदार संघातील खेडेगावातील जनतेसाठी वायझडी उद्यान निर्मिती प्रकल्प मंजूर करून घेण्यात आला आहे…येत्या भविष्यात चिखली मतदार संघातील प्रत्येक नागरिकाला आपल्या कुटुंबासोबत विरंगुळ्याचे क्षण घालविण्यासाठी कुठे दुर जाण्याची आवश्यकता नाही…तर त्यासाठी सुंदर असं वायझडी उद्यान निर्माण झालेले असेल….हा सुंदर उद्यानाचा विचार एका सुंदर मनातच येऊ शकतो…आणि ते सुंदर मन आपल्या आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील यांच्याकडे आहे…
तसेच या सुंदर मनातुन चिखली शहराला एक सांस्कृतिक ओळख निर्माण करण्याची ओढ लागलेली आहे.तर त्याच मनाच्या व्यक्तीने चिखली शहरासाठी एक भव्यदिव्य आणि वातानुकूलित सांस्कृतिक भवन मंजुर करुन घेतले आहे.येत्या भविष्यात नागरिकांसाठी ते लवकरच सुरू झालेले दिसेल… आणि यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली ती आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील यांनीच…
यादी अजुन भरपुर आहे… वरील फक्त काही ठळक भविष्यातील योजना आहेत…आणि यासाठी आपण ताईंवरती विश्वास ठेवु शकतो…कारण ताईंनी काय काय कामे केलीत…हि आपण भाग १ मधे बघितलय…आणि संत तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलंय कि,*”बोले तैसा चाले…त्याची वंदावी पाऊले…”
या मध्ये थोडीशी माझी भर घालण्याचा मोह होतोय कि,
“बोले तैसा चाले…
त्याची वंदावी पाऊले…
आम्हा विकासाची चाहुले..
सौ.श्वेताताई संगे…जय हरी विठ्ठल…
तर आपल्या मोठ्या घरामध्ये म्हणजेच आपल्या मतदारसंघांमध्ये भविष्यात जर आपल्याला सुखसुविधा पाहिज्या असतील…तर आपल्याला एका सुंदर दृष्टीकोनाची आणि संवेदनशील अशा स्री मनाची गरज आहे…आणि तो दृष्टीकोन आणि मन आपल्या रणरागिणी आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील यांच्याकडे आहेच…
म्हणून येत्या २० नोव्हेंबर रोजी कमळ चिन्हावरती उभ्या भाजपा उमेदवार रणरागिणी माननीय आमदार सौ.श्वेताताई विद्याधरजी महाले पाटील यांना बटन क्रमांक ‘४” दाबुन प्रचंड मतांनी पुन्हा विजयी करा… आणि आपल्या सेवेची एकवार पुनःच्च संधी द्या…



