4.2 C
New York
Thursday, April 9, 2026

Buy now

spot_img
spot_img

हिंदू बटेगा भी नही!और कटेगा भी नही!….विजय पवार

हिंदू बटेगा भी नही!और कटेगा भी नही!….विजय पवार

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या अध्यक्ष असलेल्या मुफ्ती सज्जाद नोमाणी यांचेकडून बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार जयश्री शेळके,चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल बोंद्रे व खामगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार व माजी आमदार दिलीप सानंदा तसेच सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघांमध्ये डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना पाठिंबा जाहीर झाल्यानंतर हिंदू संघटना जराश्या सावध झाल्या असून, अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचे लांगुनचालन करून, त्यांच्या वोट बँकेच्या आधारे निवडून आल्यानंतर साहजिकच हे आमदार म्हणून कार्य करणारे मूळ काँग्रेसी प्रवृत्तीची माणसे अल्पसंख्यांक समाजातील समाज विघातक प्रवृत्तींना उत्तेजण देण्याचा प्रयत्न तर करत नाही ? असा संशय निर्माण होत आहे.त्यामुळे आपणही अपक्ष म्हणून असलेली उमेदवारी मागे घेत असून हिंदू मतांचे विभाजन होऊ नये म्हणून आ. श्वेताताई पाटील यांना पाठिंबा देत आहोत असे विजय पवार म्हणाला.

देश धर्मनिरपेक्ष पद्धतीने चालावा, देशात धर्मनिरपेक्षता असावी असे पालुपद मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशभरात करणारे काँग्रेस व त्यांचे समविचारी लोक निवडणुका जिंकण्यासाठी मात्र मुस्लिम धर्मगुरूंचा पाठिंबा घेऊन,मुस्लिम धर्मगुरूंना आवाहन करायला लावत आहे.स्वातंत्र्य मिळाल्यापासून मुस्लिम समाजाचा आपल्या सत्ता स्थापनेसाठी वापर करून घेण्यात काँग्रेस पटाईत आहे.पण त्यांच्या या लांगुल चालनामुळे अनेक दुष्परिणाम, अनेक सामाजिक कुप्रवृत्ती उदयास आल्या.ज्याची कडू फळे इतिहासात भारताला चाखावी लागली आहे.

चिखली मतदारसंघाचे माजी आमदार व विधानसभा उमेदवार राहुल बोंद्रे यांनी चिखलीमध्ये  इमरान प्रतापगडी यांना संबोधित करण्याकरता बोलावले आहे. इमरान प्रतापगडी अल्पसंख्याक समाजातील असून त्यांचा येण्याचा उद्देश नेमका कुणाला उद्देशीत करण्याचा असू शकतो? हे समजणे अवघड नाही.

राहुल बोंद्रे यांच्या अवतीभवती मुस्लिम समाजातील अनेकांचा नेहमीच वावर असतो.राहुल बोन्द्रे यांच्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष फतवा काढतात.मुस्लिम संघटना असलेली एम आय एम ही राहुल बोंद्रे उमेदवार असलेल्या मतदारसंघात आपला उमेदवार उभा करत नाही.इमरान प्रतापगडीी सारखे अल्पसंख्यांक मुस्लिम समाजातील लोक दिल्लीवरून राहुल बोंद्रे यांचा प्रचार करण्यासाठी पाठवले जातात.यावरून हिंदू संघटना सावध झाल्या असून, काँग्रेस व त्यांच्या समविचारी पक्षांची मुस्लिमधार्जीने धोरण पाहून हिंदू संघटना देखील आपल्या उमेदवारान्नाच मतदान करण्यासाठी आवाहन करू शकतात.त्यामुळेच आपण हा निर्णय घेतला असल्याचे पवार म्हणाले.

Related Articles

ताज्या बातम्या