राष्ट्रीय वारकरी सेनेचा आमदार श्वेता ताई महाले यांना जाहीर पाठिंबा.
वारकरी संप्रदायाच्या पालखीला समर्थपणे खांदा पुरवून,सदैव महाराष्ट्र धर्म जागृत आणी तेवत ठेवण्याचे कार्य अहोरत करण्याचे काम करणारी राष्ट्रीय वारकरी सेनेने सुरु असलेल्या विधानसभेच्या रणधुमाळीत वारकरी संप्रदायाच्या खऱ्या पाईक असलेल्या चिखली विधानसभेच्या विद्यमान आमदार श्वेताताई महाले यांना आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे.
देव, धर्म आणि देशासाठी सदैव कार्यरत असलेल्या आ. श्वेताताई महाले यांनी वारकरी संप्रदाय टिकावा, वाढावा आणी देशकार्यासाठी सदैव मार्गदर्शक असावा म्हणून प्रत्येक गावात आपल्या आचरण व वाणीने एक उत्साही वातावरण तयार केले.सर्व धर्मांना योग्य मान देत असतांना त्यांनी “मंदिराचा कळस” पूर्ण करण्याकरिता पूर्णवेळ आर्थिक व राजकीय मदत पुरवली आहे.भक्ती संप्रदायाला योग्य पाठबळ पुरवून आमदार श्वेताताई महाले यांनी “मंदिरामध्ये कीर्तनाचा रंग आणि कीर्तनामध्ये टाळाचा आवाज” सतत घुमत राहील व सगळ्यांना प्रेरणादायी राहील याची नेहमीच काळजी घेतली.
यामुळे राष्ट्रीय वारकरी सेनेचे अध्यक्ष श्री विठ्ठल शंकरराव क्षीरसागर यांनी एका पत्राद्वारे आमदार श्वेता ताई महाले यांना राष्ट्रीय वारकरी सेना आपला जाहीर पाठिंबा देत असल्याचे घोषित केले आहे.व इत्या वीस तारखेला राष्ट्रीय वारकरी सेनेच्या सर्वांनी मिळून या निवडणुकीमध्ये आमदार श्वेता ताई महाले यांना निवडून आणावे असे आवाहन केले आहे.



