3.6 C
New York
Tuesday, February 17, 2026

Buy now

spot_img
spot_img

ये तो सिर्फ झांकी है! पिच्चर अभी बाकी है! – श्वेताताई महाले

मंजूर केलेली विकास कामे मार्गी लावून नवीन विकासकामांसाठी पुन्हा संधी द्या – श्वेताताई महाले.

माझ्या आमदारकीच्या कार्यकाळातील पहिली अडीच वर्षे मवीआ सरकारच्या विकास विरोधी धोरणामुळे अक्षरशः वाया गेली. त्यानंतर आलेल्या महायुतीच्या सरकारमधून खऱ्या अर्थाने विकास निधी प्राप्त झाला आणि माझ्या प्रयत्नांना फळ आले आणि म्हणूनच चिखली मतदारसंघाच्या विकासामध्ये मी भर घालू शकले. कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणत शहर व ग्रामीण भागात जास्तीतजास्त कामे करण्याचा प्रयत्न मी केला. यामधील बहुतांश कामे पूर्ण झाली असून काही कामे लवकरच पूर्णत्वास जात आहेत. या कामांना पूर्ण करण्यासाठी व नवीन विकासकामे आणून मतदारसंघाच्या प्रगतीला अधिक वेग देण्यासाठी मला पुन्हा एक वेळा मतदारांनी संधी द्यावी असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी यावेळी उपस्थितांना केले.

काँग्रेसचे उमेदवार असलेल्या माजी आमदारांनी त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात या मतदारसंघाला मागास ठेवण्याचे पाप केले. परंतु, महायुतीच्या सरकारने केवळ अडीच वर्षातच चिखली मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागाचे रूप पालटले, अनेक विकासकामे मार्गी लावत असतानाच आम्ही शासनाच्या कल्याणकारी योजनांचे सुद्धा लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम केले.

श्वेताताईंना मत म्हणजे भ्रष्टाचार मुक्त विकासाला मत – प्रकाश महाराज जवंजाळ

भविष्याचा वेध घेणारा सर्वांगीण विकास आणि सर्वसामान्य जनतेचा संपादन केलेला अतूट विश्वास म्हणजेच आ. श्वेताताई महाले यांचे नेतृत्व होय. अशा नेतृत्वाला जपण्यासाठी पुन्हा एकवार त्यांना विधानसभेत चिखली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या आणि चिखली मतदारसंघाच्या चौफेर प्रगतीला प्रतिसाद द्या . सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये उन्नती घडवणारा खराखुरा विकास म्हणजे काय असतो या त्याचा अनुभव चिखली मतदारसंघातील जनतेने या अडीच वर्षात श्वेताताई महाले यांच्या धडाकेबाज विकासकार्यातून घेतला आहे. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे चिखली शहर आणि ग्रामीण भागात जात, धर्म, पक्ष कसलाही भेदभाव न करता भ्रष्टाचार मुक्त विकास हेच ध्येय ठेवून आ. श्वेताताई महाले यांनी कार्य केले. त्याची परतफेड म्हणून श्वेताताईंना मोठया मतांनी विजयी करा, कारण श्वेताताईंना मत म्हणजेच भ्रष्टाचार मुक्त विकासाला मत होय असे प्रतिपादन भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य ह. भ. प. प्रकाश महाराज जवंजाळ यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या