गावातील चुलीवर स्वयंपाक करण्यात जन्म गेलेल्या बाईला डोळ्यांच्या व श्वसनाच्या अनेक रोगांना तोंड द्यावे लागते.बीपीएल कुटुंबांना एलपीजी कनेक्शन प्रदान केल्याने देशात स्वयंपाकाच्या गॅसचे सार्वत्रिक कव्हरेज सुनिश्चित होईल. या उपायामुळे महिलांचे सक्षमीकरण होईल आणि त्यांच्या आरोग्याचे रक्षण होईल. त्यामुळे कष्ट आणि स्वयंपाकासाठी लागणारा वेळ कमी होईल. तसेच ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठा साखळीत रोजगार उपलब्ध होईल .या उद्देशाने मा. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात “उज्वला गॅस योजना” सुरु करण्यात आली.
चुलीवर लाकडे जाळून स्वयंपाक करण्यामध्ये कित्येक आई बहिनींचे डोळे खराब होतात त्यांना श्वसनाचे विविध आजार जडतात. यामध्ये बऱ्याच वेळा डोळ्याचे ऑपरेशन देखील करावे लागते. धुराचा त्रास होऊ नये म्हणून … आमदार श्वेताताई महाले यांनी फक्त 100 रु. मध्ये गॅस सिलेंडर घरी पोहचवण्याची व्यवस्था केली. पहिला गॅस मोफत तर होताच पण या वर्षातील सर्वांना तीन सिलेंडर मोफत देण्याची व्यवस्था केली आणी अनेकांच्या महिन्याच्या खर्चामधून पैसेही शिल्लक राहायला लागले..गॅस भरण्यासाठी तास न तास रांगेत उभे राहण्याची आता गरज नाही गॅस सिलेंडर घरपोच पोहचवला जात आहे.काँग्रेस सरकारच्या काळात काळ्या बाजारात गॅस घेण्यासाठी चढाओढ लागायची आणी गॅस सिलेंडर ही फक्त श्रीमंत लोकांच्या घरातील बाब होती.पण सर्वसामान्यांच्या घरात गॅस सिलेंडर व तेही अनुदानित दरात पोहचवणाऱ्या सौ. श्वेताताई महाले यांच्या महायुतीच्या सरकारचे हे सर्वसामान्य लोकांवर उपकारच आहेत.आमच्यासारख्या सामान्य लोकांनाही जगण्याचा उचित दर्जा देत असल्यामुलेच सौ . श्वेताताई महाले याच पुन्हा आमदार म्हणून पाहिजेत.प्रत्येक सणामध्ये मोफत अन्नधान्यासोबत महायुतीच्या सरकारने “आंनदाचा शिधा” पोहचविण्याचेही कार्य केले आहे.फक्त शंभर रुपयामध्ये गरिबातील गरीबाचाही सन गोड व्हावा म्हणून सौ. श्वेताताई महाले व त्यांचे सरकार नेहमीच प्रयत्नशील आहेत
सर्व गरिबांकडे आंनदाचा शिधासुद्धा पोहचला,आम्ही सर्व खरच आंनदी आहोत कारण आता दिवाळीत आमच्यावर कर्ज करण्याची पाळी आली नाही.आमच्या आजपर्यंत दिवाळी व इतर सणासाठी होणाऱ्या कर्जातून मुक्तता देणाऱ्या म्हणून सौ.श्वेताताईच पुन्हा आमदार पाहिजे.



