3.6 C
New York
Monday, February 16, 2026

Buy now

spot_img
spot_img

दसरा संभ्रमाचा……. चर्चा राहुल बोन्द्रे व ध्रुपतराव सावळे यांच्या पक्षबदलाची! 

दसरा संभ्रमाचा…….

चर्चा राहुल बोन्द्रे व ध्रुपतराव सावळे यांच्या पक्षबदलाची!

बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणाला दिवसेंदिवस विकृत स्वरूप प्राप्त होते आहे.किंवा राज्याच्या राजकारणाचे प्रतिनिधिक स्वरूप म्हणून बुलढाणा राजकारणाला पाहता येईल.

सत्तेत असलेले डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणतात ” मी काठावर आहे. पटकन कोणत्याही पक्षात उडी मारू शकतो” तशी त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरल्याचे अधिकृत सूत्र आहे.

तर चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये विरोधात असलेले माजी आमदार राहुल बोंद्रे हे सत्तेसोबत जाण्याच्या,त्यातही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपातच जाण्याच्या रस्त्यावर असल्याचा अंदाज पत्रकार व जेष्ठ राजकीय विश्लेषक वर्तवीत आहेत.थोडक्यात भाजपात असलेल्या माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेसमध्ये आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाजपात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.जिल्हा सहकारी बँक प्रकरणात मलिन झालेली प्रतिमा भाजपाच्या वॉशिंग मशीन मध्ये स्वच्छ करून घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार राहुलभाऊ बोन्द्रे यांच्या संभाजीनगर व मुबंईच्या चकरा वाढल्याचे वृत्त आहे.

इकडे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष राहिलेले ध्रुपदराव सावळे पुन्हा आपल्या मातृपक्षात म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये या आठवड्यात प्रवेश घेत असल्याचे वृत्त असून,त्यांच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दोन वेळा पराभूत झालेल्या मुलीला ‘कीर्तीला’ राजकारणात स्थिर करण्यासाठी ते परत काँग्रेसवासी होणार आहेत.दिल्लीला जाऊन मुकुल वासनिक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आलेले ध्रुपदराव दिल्लीवरून काय रिटर्न गिफ्ट घेऊन आलेत?कदाचित भाजपामध्ये नेतृत्वाची वाढलेली संख्या व स्वतःचे वाढलेले वय पाहता स्वतःला आणी मुलीला राजकीय संधी मिळण्याच्या क्षमतेचे आकलन करून,जुन्याच घरी पुन्हा घरोबा करण्यासाठी ते काँग्रेसवासी होत असावेत अशी चर्चा आहे.

या प्रकारे निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करण्यामागे जनतेचे भले करण्याचा किती प्रामाणिक हेतू या राजकारण्यांचा असावा!याविषयी बुलढाणा जिल्ह्यातील जनतेला कुठलीही शंका नाही 🤣

Related Articles

ताज्या बातम्या