राहुलभाऊ पुन्हा तोंडावर आपटले…
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी काहीतरी आरोप करायचा,आणी श्वेताताईंनी त्या आरोपाला कुठलीही विक्षिप्त प्रतिक्रिया न देता,तोंडावर कागद फेकून मारायचा!…..पुन्हा सगळ चिडीचूप! असा खेळ चिखली विधानसभा मतदारसंघात चालला आहे.

राहुल बोंद्रे यांनी बुलढाणा येथे पत्रकार परिषद घेऊन,चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेताताई महालेे यांनी पानंद रस्त्यामध्ये 56 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता.सदर कामांची चौकशी करून अहवाल देणे संबंधी त्यांनी जिल्हाधिकारी यांना विनवले होते.त्यांनी मागितल्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी “मातोश्री पानंद रस्ते योजना” या योजनेमधून चिखली उपविभागांतर्गत येत असलेल्या सर्व कामांचा खर्च जाहीर केला असून,झालेल्या सर्व कामांमध्ये फक्त एक कोटी चाळीस लक्ष एवढ्याच रकमेची देयके देण्यात आलेली असून,हे सर्व पैसे अकुशल म्हणजे पानंद रस्ता तयार करताना जे शेतकरी व शेतमजूर यांची नावे ग्रामपंचायत यांचेकडून पाठविली गेली त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा झाले आहेत.इतर कोणतेही देयक या संदर्भात दिलेले नाही,जर सरकारने पैसे दिलेलेच नाहीत तर घोटाळा झाला कसा? हे आता राहुल बोन्द्रे यांनी स्पष्ट करावे!असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री देविदास जाधव यांनी माजी आमदार राहुल बोन्द्रे यांना केले आहे.
चिखली व बुलढाणा उपविभागीय अधिकारी बांधकाम यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून,कोणतीही पुरावे नसताना बिन बुडाचे आरोप केल्याने कर्मचार्यांचे खच्चीकरण होते,तसेच श्री राहुल बोंद्रे यांनी केलेल्या तक्रारीत कोणतेही तथ्य आढळून येत नसल्याचे व त्यांनी जाणूनबुजून शासनाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत असल्याचे नमूद केले आहे.
आमच्या आमदार स्वच्छ असल्याचे पत्र आता आमच्या जवळ आहे!.राहुल भाऊ जिल्हा बँकेतून ते स्वच्छ असल्याचे पत्र कधी घेऊन येतील? हे त्यांनी सांगावे असा खोचक टोमणाही देविदास जाधव यांनी लगावला.”आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करत राहायचे,ही कोती मानसिकता राहुल बोंद्रे यांनी आता सोडली पाहिजे !”असा सल्लाही श्री देविदास जाधव यांनी दिला.



