-1.1 C
New York
Saturday, February 14, 2026

Buy now

spot_img
spot_img

होय! राहुल बोन्द्रे यांच्यावर कर्ज आहे…. ” बुलढाणा दर्पणने केली सत्याची उकल”

होय! राहुल बोन्द्रे यांच्यावर कर्ज आहे…. ” बुलढाणा दर्पणने केली सत्याची उकल”

जिल्हा सहकारी बँकेचे निवृत्ती एम.डी. पंढरीनाथ टेकाळे यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे, माजी आमदार काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांच्यावर कुठलेही कर्ज नसल्याचे सांगितले.पण बुलढाणा दर्पण यांनी जिल्हा सहकारी बँकेचे सीईओ अशोक खरात यांच्याशी संपर्क साधला असता जिल्हा सहकारी बँकेचे,अद्यापही राहुलभाऊ बोन्द्रे हे संचालक व अध्यक्ष असलेल्या मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणी व अनुराधा सुगर मिल्स या संस्थांकडे कर्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

काही सूत्रांकडून माहिती घेतली असता, राहुल बोंद्रे संचालक व अध्यक्ष असलेल्या या संस्थांनी जिल्हा सहकारी बँकेतून कोट्यावधी रुपये कर्ज म्हणून घेतले, त्या कर्जाची मुद्दल व व्याज आता 94 कोटी एवढे झालेले आहे.पंढरीनाथ टेकाळे हे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की जिल्हा बँकेतून राहुल बोन्द्रे यांनी वैयक्तिक कुठलही कर्ज घेतलेले नाही.हो हे खर आहे!!

पण राहुल बोंद्रे यांच्या संस्थांनी जे कर्ज घेतली, त्या कर्जाच्या जामीनासाठी स्वतः माजी आमदार राहुल बोन्द्रे, त्यांचे वडील श्री सिद्धिविनायक बोंद्रे, तसेच राहुल बोंद्रे यांचे बंधू यांनी सरकारी मुंद्राकावर शपथपत्र सादर करून,संस्थेला देण्यात येत असलेल्या कर्जाची गॅरंटी घेतली आहे.त्यांच्या गॅरंटीवरच या संस्थांना ही कर्ज देण्यात आली होती.मग कर्ज बुडाल्यावर ते भरण्याची जबाबदारी कुणाची?

पंढरीनाथ टेकाळे यांनी आपल्या पोस्टमध्ये सूतगिरणी कडील कर्ज जिल्हा बँकेचे नाही तर राज्य सहकारी बँकेचे असल्याचे सांगितले आहे.आता राज्य सहकारी बँक हीच जिल्हा सहकारी बँकेची शिखर बँक असते, “कर्ज” जिल्हा सहकारी बँकेची असो की राज्य सहकारी बँकेचे असो जर कर्ज डुबवले जात असेल तर यात नुकसान हे शेतकऱ्यांचेच होते,शेतकरी भागधारक असलेल्या कुठल्याही बँकेचे कर्ज कुणी डुबवत असेल,तर ती “शेकऱ्यांशीच गद्दारी” नाही का?

पंढरीनाथ टेकाळे यांनी ज्या भूमिकेतून राहुल बोन्द्रे यांची पाठराखण करण्याकरिता फेसबुक पोस्ट तयार करून सत्याविषयी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यातून त्यांच्याच कर्तृत्वाविषयी,निष्ठेविषयी संशय निर्माण होत आहे.संपूर्ण राज्याला जिल्हा केंद्रीय सहकारी बँक बुलढाणा यातील मलई कोणी खाल्ली? याविषयी पुरेशी माहिती वर्तमानपत्रातून उपलब्ध असताना कुण्या एका राजकीय व्यक्तीची पाठराखण करण्यासाठी पोस्ट करणे हा हेतू नसेल तर तर जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या डबघाईला येण्याची कारणे पुराव्यानिशी मांडणे अपेक्षित आहे.यासंबंधी बुलढाणा दर्पण लवकरच श्री पंढरीनाथ टेकाळे यांना भेटून अधिक सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या