4.2 C
New York
Thursday, April 9, 2026

Buy now

spot_img
spot_img

“हिंदूसूर्य महाराणा प्रतापजी” आर्थिक विकास महामंडळाची घोषणा….. राजपूत समाजात चैतन्याची लहर…

आ. श्वेताताई महाले यांच्यावर राजपूत समाज बांधवाकडून कौतुकाचा वर्षाव…

चिखली : राजपूत समाजाच्या प्रगतीसाठी आणि सर्वांगिण विकासासाठी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “हिंदूंसूर्य महाराणा प्रतापजी आर्थिक विकास महामंडळाची” घोषणा केल्याने आ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या सभागृहात राजपूत समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाची म्हणजे “हिंदूंसूर्य महाराणा प्रतापजी आर्थिक विकास महामंडळाची” स्थापना करनार असल्याबद्दल घोषणा केली होती, त्या अनुषंगाने राजपूत समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी “हिंदूसूर्य महाराणा प्रतापजी” आर्थिक विकास महामंडळाला आज कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली.त्यामुळे सकल राजपूत समाज बांधवांच्या उन्नतीचा मार्ग मोकळा झाल्याने संपूर्ण राजपूत समाज बांधवांमध्ये आनंदाची एक लहर निर्माण झाल्याचे दिसून आले.

“आपण सतत यासंबंधी पाठपुरावा केला आणी आपल्या मागणीला मूर्त स्वरूप मिळाल्याने राजपूत समाज बांधवानी माझेवर सतत दाखवलेला विश्वास आपण सार्थ करू शकल्याची भावना निर्माण झाल्याचे आ. सौ महाले म्हणाल्या”

हिंदू सूर्य आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाल्याने आमदार श्वेताताई महाले यांनी, अनेक वर्षापासून राजपूत समाजाच्या हितासाठी महामंडळं स्थापन करण्यात यावे ही राजपूत समाजाची भावना प्रत्यक्षात आणल्याने, सर्व राजपूत समाज बांधवांकडून आमदार श्वेताताई महाले यांचेे कौतुक होत आहे.”राजपूत समाजाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते जपून आमदार श्वेताताईंनी सकल राजपूत समाजाच्या सर्व भावनांचा आदर राखला आहे.” असे मत सर्व समाज बांधवांकडून व्यक्त केल्या जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या