चिखली:(बुलढाणा दर्पण) बुलढाणा येथे महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण कार्यक्रमात माननीय मुख्यमंत्री यांना द्यावायचे ” शेतकऱ्यांच्या रक्तांने लिहिलेले, शेतकऱ्यांच्या मागण्याचे, शेतकऱ्यांचे पोलीसी” पोलीसी बळाचा वापर करून फाडून टाकले,शेतकऱ्याच्या रक्ताचा झालेला अपमान हा सरकारच्या असंवेदनशीलतेचा कळस आहे.शेतकऱ्यांच्या रक्ताचा झालेल्या या अपमाणाबद्दल गृहमंत्री व पोलीस प्रशासन यांनी माफी मागावी, तसेच शेतकऱ्यांच्या काही आणखी मागण्या सरकारच्या कानावर टाकाव्या म्हणून, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी, काही शेतकरी बांधवांसोबत चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे “अन्नत्याग आंदोलन” सुरू केले आहे.

आज सकाळी सावरगाव डुकरे येथील महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि इतर महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करून व पुष्पहार अर्पण करून माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू झाल्याचे घोषित केले.शेतकऱ्यांसोबत सुरू करत असलेल्या या अन्नत्याग आंदोलनात शेतकऱ्यांच्या कष्टाचे महत्व, या आंधळ्या सरकारला दाखवण्यासाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी समाविष्ट व्हावे असे आवाहन माजी आमदार राहुल बोन्द्रे यांनी केले आहे.

गोरगरिबांच्या सेवेत आयुष्य अर्पण केलेल्या सर्व महापुरुषांना वंदन करून आपण या अन्न तयार आंदोलनाची सुरुवात करीत आहोत, आपल्या हक्कासाठी संघर्ष करणे हे आपले कर्तव्य आहे, सोयाबीनला भाव, कर्जमाफी, पिक विमा, सिंचन अनुदान, शेताला दिवसा विज, वन्य प्राण्यांपासून संरक्षण, या व इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.त्यासाठी या आंदोलनात प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष, समाविष्ट होण्याचे आवाहन माजी आमदार राहुल बोन्द्रे यांनी केले.



