4.2 C
New York
Thursday, April 9, 2026

Buy now

spot_img
spot_img

मंत्री महोदयांनी गम्पंती आणला..

प्रतापरावांच्या निवासस्थानी बाप्पा विराजमान !

मेहकर:
केंद्रीय मंत्री प्रतापराव गणपतराव जाधव, यांचा परिवारच अध्यात्मिक भावनेनं भारावलेला. श्री गणेश चतुर्थीच्या पावनपर्वावर आज शनिवार ७ सप्टेंबर रोजी त्यांच्या मेहकर येथील निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन होऊन विधिवत पूजन झालं.

केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त गणरायाचे आगमन होताच, सहकुटुंब विधिवत पूजन करून विघ्नहर्ताचे प्रतापराव जाधव यांच्या परिवाराने सहर्ष स्वागत केले. गणेश भक्ताच्या जीवनातील दुःख नाहीसे होऊन देशातील जनता सुखी समृद्ध आणि निरोगी आयुष्य मिळू दे.. बळीराजाला चांगले दिवस येऊ दे , असे साकडे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी गणरायाच्या चरणी घातले. गणरायाची विधिवत पूजा-अर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ. राजश्री जाधव, मुलगा ऋषिकेश जाधव, सून सौ. मयुरी, नातू रणविर आणि पुतण्या धिरज जाधव असा आप्त परिवार होता.

Related Articles

ताज्या बातम्या