-2.7 C
New York
Friday, February 13, 2026

Buy now

spot_img
spot_img

चिखली नगरपालिकेत भाजपाचा झेंडा,पंडितराव देशमुख नगराध्यक्ष पदी विजयी.

चिखली नगराची विकासाला साथ… आ. श्वेता महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास…

चिखली नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पंडितराव देशमुख यांनी दणदणीत विजय मिळवला असून, हा विजय चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या प्रभावी मार्गदर्शनाचा आणि विकासाभिमुख नेतृत्वाचा ठळक प्रत्यय देणारा ठरला आहे.

या निवडणुकीत भाजपाचा विकासाचा अजेंडा, आमदार श्वेता महाले पाटील यांची विकासाची स्पष्ट हाक, तसेच चिखली शहरात सुरू असलेली विविध विकासकामे यांना मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर असलेला जनविश्वास आणि त्यांनी चिखली शहरात घेतलेल्या जाहीर सभेमुळे भाजपाच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले, असे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.

पंडितराव देशमुख यांचा साधा,सरळ आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सहज मिसळणारा स्वभाव, तसेच स्थानिक प्रश्नांची जाण सोबतच तरुण तडफदार आ.श्वेता महाले यांनी चिखली शहरासाठी मोठया प्रमाणावर खेचून आणलेला विकासनिधी व नियोजित शहर विकासाचा आराखडा यामुळे चिखलीकरांनी पंडितराव देशमुख यांना मोठ्या विश्वासाने नगराध्यक्ष पदाची संधी दिली. विकासाला प्राधान्य देणारी भूमिका, पारदर्शक कारभाराची हमी आणि सर्व घटकांना सोबत घेऊन शहराच्या प्रगतीसाठी काम करण्याचा निर्धार यामुळे हा विजय अधिक अर्थपूर्ण ठरतो.

या निकालामुळे चिखली शहराच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळणार असून, नगरपालिकेत भाजपाच्या माध्यमातून विकासकेंद्रित आणि लोकाभिमुख प्रशासनाची नवी सुरुवात होईल, असा विश्वास कार्यकर्ते आणि नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे…

Related Articles

ताज्या बातम्या