13.9 C
New York
Saturday, April 11, 2026

Buy now

spot_img
spot_img

विद्याधर महाले यांच्या बदनामीची मोहीम.. हाच बोन्द्रेच्या गढीवर त्यांनीच मारलेला शेवटचा घन.

विद्याधर महाले यांच्या बदनामीची मोहीम.. हाच बोन्द्रेच्या गढीवर त्यांनीच मारलेला शेवटचा घन…

विधानसभा निवडणुकीत बोन्द्रेनी दाखवलेली भीती व बदनामी यावेळेस ठरली निरूपयोगी…

नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी शहरातील लोकांना भीती दाखवली. बॉम्बे मार्केट असो किंवा मुस्लिम वस्तीतील आणि इतर वस्त्यांमधील अतिक्रमणे असो किंवा हातगाडी किंवा छोटे व्यवसाय करणारे व्यावसायिक असो यांना भीती दाखवण्यात आली.

त्याचप्रमाणे आमदार श्वेता महाले आणि भाजपा कुटुंबातील सगळ्यांचे मनोधर्य खचावे म्हणून मंत्रालय अधिकारी असलेले श्री विद्याधर जी महाले यांच्या बदनामीसाठी राहुल बोंद्रे यांच्याकडून पद्धतशीर मोहीम राबविली गेली.

परंतु यापैकी कशालाही बळी न पडता आमदार श्वेता महाले यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत चिखलीकरांनी श्वेता ताईंच्या आवाहनाला प्रतिसाद देत पंडित दादा देशमुख सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला चिखली नगराध्यक्ष पदावर बसवले.

बोंद्रे कुटुंबाच्या परंपरागत गढीवर शेवटचा हातोडा मारण्याचे काम विद्याधर महाले यांची बदनामी करून काँग्रेसने स्वतःच केले. राहुल बोंद्रे यांचा विद्याधर महाले यांच्यावर असलेला वैयक्तिक आकस, आणि आमदार सौ श्वेता महाले पाटील यांच्यासारख्या सुसंस्कृत राजकारणी स्त्रीच्या नावाचा अपभ्रंश करून मूर्खपणा करण्याचे पाप करणाऱ्या राहुल बोंद्रे आणि काँग्रेसला चिखलीतील जनतेने चांगलाच धडा शिकवला असे मत चिखलीतील जनतेतून व्यक्त होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या