4.2 C
New York
Thursday, April 9, 2026

Buy now

spot_img
spot_img

चिखलीच्या विकासाचा नवा धागा  ‘बालाजी सहकारी सूतगिरणी’च्या शुभारंभी औद्योगिक प्रगतीचा नवा अध्याय.

चिखलीच्या विकासाचा नवा धागा  ‘बालाजी सहकारी सूतगिरणी’च्या शुभारंभी औद्योगिक प्रगतीचा नवा अध्याय…

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव आणि चिखली तालुक्याचे सुपुत्र श्री. विद्याधर दयासागर महाले यांच्या दूरदृष्टीतून चिखली तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल उचलले गेले आहे. दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘बालाजी सहकारी सूतगिरणी’ या कापड व्यवसायातील पहिल्या युनिटचे उद्घाटन संपन्न झाले असून, या प्रकल्पातून चिखली तालुक्याच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीचा नवा धागा विणला जात आहे…

या प्रकल्पांतर्गत एकूण 21 युनिट्स उभारण्यात येणार असून सध्या पहिले युनिट कार्यान्वित झाले आहे. येथे दररोज 14 हजार किलो कापूस प्रक्रिया करून उच्च दर्जाचा धागा तयार केला जातो. विशेष म्हणजे हा धागा रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया अशा प्रगत देशांमध्ये निर्यातही केला जात आहे. या पहिल्या युनिटमध्ये 25,000 स्पिन्डलची क्षमता असून सुमारे 250 स्थानिकांना रोजगार प्राप्त झाला आहे. संपूर्ण 21 युनिट्स सुरू झाल्यानंतर या ठिकाणी पाच ते दहा हजार लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाला पुढे टेक्सटाईल पार्कच्या स्वरूपात विकसित करण्याचा दृष्टिकोन श्री. महाले साहेब यांनी ठेवला आहे.

उदयनगर जवळच्या तोरणवाडा या ग्रामीण पार्श्वभूमीतून शिक्षण आणि गुणवत्तेच्या जोरावर उच्च पदावर पोहोचलेले श्री. विद्याधर महाले यांनी आपल्या मातीबद्दलच्या कर्तव्यभावनेतून, समाजाप्रती असलेल्या उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून हा प्रकल्प उभारला आहे. राजकीय गुंडशाहीला न जुमानता आपल्या अर्धांगिनीच्या सोबत समाजहितासाठी उभे राहणारे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रगत विचार आत्मसात करून विदर्भातील अविकसित भागाला विकसित करण्याचा संकल्प करणारे हे व्यक्तिमत्त्व आज चिखलीच्या औद्योगिक क्रांतीचे प्रतीक बनले आहे.

पूर्वी चिखली शहरातही सूतगिरणी उभारण्यात आली होती, मात्र त्या काळातील सूतगिरणीच्या स्थापनेमागे खरी सहकारी भावना नव्हती. सहकारी सूतगिरणीच्या नावाखाली प्रत्यक्षात खाजगी मालकांनी त्यावर ताबा घेतला. सहकाराच्या नावाखाली राजकीय आकांक्षेला पोसण्यासाठी आणि वैयक्तिक फायद्यासाठी त्यांनी 100 कोटींपर्यंतचे कर्ज घेतले आणि अखेर सूतगिरणी बुडवण्यात आली. त्या सूतगिरणीचा हेतू राजकीय लाभ मिळवणे हा होता, त्यामुळे रोजगारनिर्मिती, पारदर्शकता आणि आर्थिक स्थैर्य या सगळ्या गोष्टी गाळल्या गेल्या.

याउलट ‘बालाजी सहकारी सूतगिरणी’ ही केवळ कागदोपत्री नव्हे तर व्यवहारातही खऱ्या अर्थाने सहकारी तत्वावर आधारित आहे. या प्रकल्पात पारदर्शक व्यवस्थापन, आर्थिक शिस्त, आणि जागतिक दर्जाचे उत्पादन यावर भर देण्यात आला आहे. रोजगार निर्मिती ही या प्रकल्पाची कणा असून प्रारंभीच 250 लोकांना रोजगार देत पुढील काही वर्षांत हजारो लोकांना रोजगार देण्याचा उद्देश स्पष्टपणे दिसतो.

जुनी आणि नवी सूतगिरणी यांमधील हा फरक म्हणजेच दोन दृष्टिकोनांमधील अंतर — एकीकडे राजकीय हेतूसाठी उभारलेला उद्योग आणि दुसरीकडे गुणवत्तेच्या, दूरदृष्टीच्या आणि जबाबदारीच्या भावनेतून उभा राहिलेला विकासाचा प्रकल्प. जुनी सूतगिरणी जिथे स्वार्थाच्या जाळ्यात अडकून बुडाली, तिथे विद्याधर महाले यांच्या सूतगिरणीने समाजहिताचा धागा पकडून चिखलीच्या प्रगतीचे नवे वस्त्र विणायला सुरुवात केली आहे.

या सूतगिरणीमुळे चिखली तालुका केवळ विदर्भातील औद्योगिक नकाशावरच नव्हे, तर राज्याच्या निर्यातक्षेत्रातही ठसा उमटवेल. “कापसाच्या शेतीपासून कपड्याच्या उद्योगापर्यंतचा प्रवास आता चिखलीतच पूर्ण होणार आहे”, हे श्री. विद्याधर महाले यांच्या दृष्टीकोनाचे सार असून, या उपक्रमातून ग्रामीण विकास, औद्योगिक स्वावलंबन आणि सामाजिक परिवर्तनाचा त्रिवेणी संगम साधला जात आहे…..

Related Articles

ताज्या बातम्या