4.2 C
New York
Thursday, April 9, 2026

Buy now

spot_img
spot_img

आम्ही फक्त सतरंज्या उचलायच्या का? जळगाव येथील मुस्लिम कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांना दिला घरचा आहेर. कॉल रेकॉर्डिंग व्हायरल.

मुस्लिम समाजाला शहराध्यक्ष पद देण्याचे आश्वासन देऊन देखील पद दिले नाही. यावरून जळगाव जामोद येथील मुस्लिम समाजाच्या तरुणाने आपला संताप फोनवरून व्यक्त केला.

संविधान आणि लोकशाही या विषयावर सतत मागील वर्षपासून राहुल बोन्द्रे हे प्रत्येक ठिकाणी भाषण देत असतात. पण जळगाव जामोद येथील एका समाजावर पद देण्याच्या बाबतीत कसाकाय अन्याय होऊ शकतो, हे एक कोडेच आहे.

याबद्दलची जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल बोन्द्रे आणि संताप व्यक्त करणाऱ्या मुस्लिम तरुणांची कॉल रेकॉर्डिंग सध्या तुफान व्हायरल होत आहे. वर्षानुवर्षांपासून मुस्लिम समाजाला काँग्रेस आपली नैसर्गिक वोट बँक समजत आहे. साहजिकच आहे या समाजातील तरुणांचे राजकीय भावनांना उधान येणे.

एखाद्या पक्षासाठी निवडणूकमध्ये दिवस-रात्र मेहनत घेऊन काम करणे आणि बदल्यात नेतृत्व करण्याची, एव्हाना पद मागण्याची वेळ आल्यानंतर काहीतरी कारण सांगून डावलने असाच काहीसा प्रकार जळगाव जामोद येथील मुस्लिम समाजाच्या बाबतीत घडल्याचे समजत आहे.

राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळावी हे प्रत्येक समाजातील तरुणांचे स्वप्न असते. यासाठी तरुण वाटेल ती मेहनत घेतात अगदी सामाजिक स्तरात जाऊन म्हणा की, सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजसेवेची स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी पक्षश्रेष्ठींना आपल्या कार्याची पावती देतात. आणि आपल्या कार्याला न्याय मिळावा हीच त्यांची भाबडी भावना असते.

पण डिजिटल युगाच्या या पार्श्वभूमीवर कुठलीही गोष्ट लपून राहत नाही. जळगाव जामोद येथील मुस्लिम तरुणाने आम्ही निवडणुकीमध्ये काम करून देखील आम्हाला कुठल्याही प्रकारचे पद तुम्ही आश्वासन देऊन देखील समाजाला दिले नाही. आम्ही फक्त चटाया उचलायच्या का?  याबाबतचे प्रश्न विचारून हाताश होऊन कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केली आहे.

सदरील कॉल रेकॉर्डिंग सध्या तुफान चर्चेत असून मुस्लिम समाजासाठी काँग्रेसने काय केले याबद्दल जोराने चर्चा गल्लोगल्ली होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या