23.5 C
New York
Wednesday, June 17, 2026

Buy now

spot_img
spot_img

“चिखली मतदारसंघाला पारितोषिक मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू” – आमदार श्वेता ताई महाले

सावळी येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ कार्यशाळा

“चिखली मतदारसंघाला पारितोषिक मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू” – आमदार श्वेता ताई महाले

ग्रामीण विकासाची नवी दिशा ठरवणारे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा आज चिखली मतदारसंघातील सावळी (ता. बुलढाणा) येथे संपन्न झाली. या अभियानाविषयी सविस्तर माहिती देताना आमदार श्वेता ताई महाले म्हणाल्या, “या अभियानाचा उद्देश प्रत्येक ग्रामपंचायतीला सक्षम, पारदर्शक आणि विकासाभिमुख करणे आहे. यातून गावागावात शाश्वत विकास घडवून आणण्याची ताकद ग्रामपंचायतींना मिळेल. पाणी, वीज, रस्ते, शाळा, अंगणवाडी, महिला बचत भवन, ग्रामस्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधा या अभियानाद्वारे अधिक प्रभावीपणे उपलब्ध होतील.”

चिखली मतदारसंघातील बुलढाणा तालुक्यातील नागरिकांसाठी त्यांनी आतापर्यंत प्रत्येक गावात महिला बचत भवन, अंगणवाडी इमारती, जिल्हा परिषद शाळांसाठी वर्गखोल्या, गावजोड रस्ते, पाणी पुरवठा योजना, वीजपुरवठा, नवीन ट्रान्सफॉर्मर, पाणंद रस्ते आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याचे त्या म्हणाल्या. गावकऱ्यांनी विकासासाठी लोकचळवळ उभी करावी, अशीही त्या वेळेस ग्वाही दिली.

आमदार महाले पुढे म्हणाल्या की, “ज्या गावांना पाणंद रस्त्यांची गरज आहे, त्या प्रत्येक गावाला मी माझ्या आमदार निधीतून 5 लाख रुपये देणार आहे. हे समृद्ध पंचायत राज अभियान 17 सप्टेंबरपासून सुरू होत असून 31 डिसेंबर 2025 पर्यंत चालणार आहे. या काळात आपल्या चिखली मतदारसंघाला बक्षीस मिळालेच पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत. मी नेहमीच आपल्या पाठीशी उभी आहे.”

या कार्यक्रमास गटविकास अधिकारी श्री. सुरेश तायडे, श्री. एल. पी. सुरडकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. देविदास पाटील जाधव, सावळीचे सरपंच डाॅ. श्री. तेजरावजी नरवडे, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. अनिलजी जाधव, सरपंच संघटनेचे अध्यक्ष श्री. अनिलभाऊ फेपाळे, श्री. विष्णूभाऊ वाघ, धाडच्या सरपंच सौ. सावित्रीबाई बोर्डे, सौ. अनुराधाताई भुसारी, सरपंच संघटनेचे सचिव श्री. देवा बर्डे, श्री. गजानन लांडे पाटील, ग्रामसेवक संघटनेचे श्री. संदीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या