27.1 C
New York
Sunday, June 21, 2026

Buy now

spot_img
spot_img

जन्महिन्दू आहोतच आता कर्महिन्दू बनन्याची गरज…. आ. सौ. श्वेताताई महाले पाटील.

जन्महिन्दू आहोतच आता कर्महिन्दू बनन्याची गरज…. आ. सौ. श्वेताताई महाले पाटील.

गोसेवाधाम व गोविज्ञान केंद्राचा वर्धापन दिन साजरा…

हिंदु धर्मशास्त्राने गाय, नदी आणि भारतभूमी यांना ‘देवी’ संबोधून त्यांना मातेचे स्थान दिलेे आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदूसाठी गोमाता पूजनीय आहे.गोमातेचे महत्त्व ज्ञात नसलेले आणि गायींना खाटीकखान्यात पाठवणारे स्वातंत्र्यापासून साठ वर्ष भारतात राज्य करणारे हिंदु शासनकर्ते केवळ जन्महिंदू आहेत, कर्महिंदू नव्हेत. परंतु आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र सरकारने देखील गोवंशीय जनावरांची हत्या न करण्याचा कायदा करून आपल्या मूळ संस्कृतीला आपल्या जीवनाचा भाग बनवण्याचे पुण्य कर्म केले आहे. असे उद्गार चिखलीच्या आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी काढले.

गोमातेच्या दिव्यत्वाची जाणीव ठेवून त्यासाठी सेवारत व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्याचे भाग्य आज मला लाभल्याचे उदगार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी काढले. किन्ही नाईक येथील श्री जगदंबा माता गौरक्षण सिद्धपीठ व चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचलित गायत्री गोसेवाधाम व गोविज्ञान केंद्र येथे वर्धापन दिन व सत्कार सोहळ्यात सहभागी होऊन गोमातेचे त्यांनी पूजन केले. यावेळी गायत्री गोसेवाधाम व गोविज्ञान केंद्र पर्यटन अंतर्गत 30 लक्ष रुपयांचा निधी त्यांनी मंजूर केला तसेच या पुण्याच्या कार्यात उल्लेखनीय योगदान देणार्‍या माता-भगिनी व बांधवांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी बोलताना आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील म्हणाल्या की गायीच्या दुधात शरीर पोषणासाठी महत्वाचे अन्नघटक उपलब्ध असल्याने गायीचे दूध हे पूर्णअन्न मानले जाते. देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारातील महत्व, तसेच सेंद्रिय शेती पद्धतीत गायीचे शेण व मूत्राचे महत्व विचारात घेता देशी गायीच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे. त्यामुळे देशी गायीला राज्यात राजमाता गोमाता असा दर्जा देण्यात आला आहे. सनातन धर्मात प्रचंड महत्व असलेल्या गोमातेचे संरक्षण व त्यातून भारतीय संस्कृतीचे संवर्धन हेच देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे उद्दिष्ट आहे असे आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील म्हणाल्या.

या सोहळ्यास केंद्रीय मंत्री मा. श्री. प्रतापरावजी जाधव, प्रदेश प्रवक्ते श्री. विनोदजी वाघ, उपजिल्हा प्रमुख श्री. शिवाजीराव देशमुख, तालुका अध्यक्ष श्री. अमोलजी साठे, डॉ. पंकजजी भिवरे, जिल्हा प्रमुख सौ. मायाताई म्हस्के, तालुका प्रमुख श्री. गजानन मोरे, श्री. योगेशजी राजपूत, श्री. सतीश पाटील, श्री. जितेंद्र पुरोहित, श्री. मुरलीधर गायकवाड, श्री. रवीभाऊ भगत, श्री. पंढरी पाटील, सौ. सवडतकर मॅडम, संस्थानचे अध्यक्ष श्री. विनोदजी कोकाटे, श्री. कैलासजी सुरडकर आदी मान्यवर, गोसेवक माता-भगिनी व बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related Articles

ताज्या बातम्या