कुलसचिव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या आदेशान्वये चिखली येथील कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी खामगाव रोड चिखली या महाविद्यालयाला 2025 26 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रथम वर्ष प्रवेश घेण्यास मनाई करण्यात आल्याचे पत्र विद्यापीठाने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. सदर महाविद्यालयाने प्राचार्य व शिक्षक यांची नियुक्ती न केल्यामुळे विना प्राचार्य व विना शिक्षक असलेल्या महाविद्यालयावर 2025 26 या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षाकरिता मुलांनी प्रवेश घेऊ नयेत म्हणून विद्यापीठाकडून सावधानतेचा इशारा म्हणून ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी हे महाविद्यालय चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या संस्थेकडून चालवले जाते. प्रसिद्ध, नामांकित व इतर खोट्या विशेषणांनी आपले महाविद्यालय सजवायची, गरीब मुला-मुलींचे आयुष्य घडवले जाईल असे आमिष दाखवून त्यांना आपल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायला लावायचा, नंतर या गरीब विद्यार्थ्यांना सरकारकडून मिळालेल्या स्कॉलरशिप समाज कल्याण अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपल्या घशात ओतायच्या, आणि वरून डोनेशन, प्रवेश शुल्क, कॉलेज फेस्टिवल फी, इतर दंड असे विविध शुल्क आकारून गरीब विद्यार्थ्यांना लुटायचे हाच गोरख धंदा या महाविद्यालयांनी चालवलेला दिसत आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शिकवायला शिक्षकही नाहीत तर इतर सुविधा कुठून देण्यात येतील? विद्यापीठाने ही यादी प्रसिद्ध करून राहुल बोंद्रे यांच्या महाविद्यालयाचा आवास्तव फुगा फोडल्याचे दिसून येत आहे. यावरून राहुल बोंद्रे आणि त्यांची शिक्षण संस्था प्रवेश घेतलेले शेकडो विद्यार्थी, त्यांची कुटुंबे आणि सरकार या सगळ्यांनाच फसवत आहे का? असा प्रश्न निर्माण होतो आहे.



