*चिखली मतदारसंघ सुंदर बनविण्याची गोष्ट:भाग १ (चिखली शहर)*
या गोष्टीला सुरुवात होते २०१९ विधानसभा निवडणुक निकालानंतर…भाजपा उमेदवार रणरागिणी माननीय आमदार श्वेता ताई निवडुन येतात…आणि मतदार संघ सुंदर बनविण्याची गोष्ट चालु होते…
स्त्री जातीचा एक विशेष गुण असतो कि, त्या आपलं घर व्यवस्थित,नीटनेटके, स्वच्छ आणि सुंदर ठेवतात…त्याच पध्दतीने मतदार संघाला आपलं घर मानून तो व्यवस्थित, नीटनेटका , स्वच्छ आणि सुंदर बनविण्याचा ध्यास घेऊन प्रवास सुरू झाला…
सर्वप्रथम चिखली शहर स्वच्छ असावे म्हणून जास्तीत जास्त घंटागाड्या विकत घेऊन.प्रत्येक प्रभागांमध्ये प्रत्येक घरापर्यंत कशी पोचेल.आणि घरातील कचरा लगेच घराबाहेरून उचलण्याची मोफत व्यवस्था केली… इथुन चालु झाली स्वच्छ, सुंदर चिखली मोहिमेला सुरुवात…आणि आज बघता बघता चिखलीने स्वच्छतेच्या बाबतीत आपलाल एक दर्जा निर्माण केलाय… यातुन आमदार सौ.श्वेताताईंचा स्वच्छतेचा ध्यास आणि दृष्टीकोन दिसुन येतोय…
त्यानंतर सुरुवात झाली ती चिखली शहरातील जवळपास सर्व रस्ते सिमेंट कॉक्रेंटीकरन करण्याची आणि अतीउच्च दर्जाची शहराअंतर्गत दळणवळण व्यवस्था उपलब्ध करून देण्याची… आणि आज चिखलीतील जास्तीत जास्त रस्ते हे सिमेंट कॉक्रेंटीकरन झालेले आहेत…आणि आज चिखली शहरामध्ये दर्जेदार दळणवळण व्यवस्थेचं हे जाळं निर्माण झालं ते आपल्या रणरागिणी आमदार श्वेता ताई महाले पाटीलामुळे…
त्यानंतर चिखलीला सुंदर बनविण्याच्या लक्षाचा ध्यास घेऊन.सर्वप्रथम खामगांव चौफुलीला सुंदर आणि भव्यदिव्य स्वरूप प्राप्त करून दिले… आणि तेथील अर्थकारणालाही उच्च वेग प्राप्त करून दिला…आज खामगांव चौफुली एखाद्या महानगरपालिका शहरातील चौफुलीला तोडीस तोड देते… आणि चिखलीला एक आगळवेगळं आणि भव्यदिव्य असं वैभव प्राप्त करून देते… तसेच त्यानंतर आज सिध्द सायन्स चौक बघितला तर तोही खुप भव्यदिव्य आणि नेत्रदीपक झालेला आहे…तसेच चिखली बसस्थानक परिसर व्यवस्थित पध्दतीने विकसित करून स्वामी विवेकानंदाचे स्मारक उभारून चिखलीच्या सुंदरतेत भर घातली… आणि चिखलीच्या इतिहासापासून बैलजोडी परिसरात जी गर्दीची समस्या होती,ती आज इतिहास जमा झालेली…आज बैलजोडी परिसर फार मोकळा आणि स्वच्छ श्वास घेत आहेत…आज बैलजोडी परिसर फार सुंदर पध्दतीने विकसित करून चिखलीच्या भव्यदिव्यतेत आणि सुंदरतेत एक मानाचा तुरा रोवला… आणि तो तुरा रोवणारे हात होते आमदार श्वेताताई महाले पाटीलामुळे…
मग ध्यास लागला तो चिखलीला झगमगीत करण्याचा…आज चिखलीच्या प्रत्येक प्रभागात तुम्हाला हायमस्ट लाईटचे दिवे दिसतील… आणि रात्रीच्या वेळी आपणास चिखली झगमगीत झालेली दिसते.ज्यावेळेस आपण चिखलीचे ड्रोनच्या सहाय्याने घेतलेले छायाचित्र बघतो,तर एक सुंदर मनमोहक आणि विहंगम छायाचित्र दिसतं…
आज चिखलीमध्ये आपल्या घरी एखादा पाहुणा आल्यानंतर म्हणतो कि,”चिखली काही बदलली…रात्री पण झगमग आहे तुमच्या कडे…”तर उर अक्षरशा अभिमानाने भरून येतो…
विकास हा सांगण्याची किंवा कागदावरती लिहुन दाखविण्याची गोष्ट नाही…तर ती प्रत्यक्ष डोळ्यांना दाखविण्याची आणि अनुभव करुन देण्याची गोष्ट आहे… आणि हि चिखली मतदार संघाची खरी सुंदर गोष्ट साकारण्यासाठी मतदार संघातील जनतेच्या सहाकार्याने आणि थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने माननीय आमदार रणरागिणी सौ.श्वेतातताई महाले पाटील सतत प्रयत्नशील आहेत….
विकासही सुंदर पध्दतीने होऊ शकतो,हे ताईंनी दाखवून दिले…म्हणून तर हा सुंदर, स्वच्छ आणि नीटनेटका विकास आपल्याला अशाच सातत्याने सुरू ठेवायचा असेल…तर माननीय आमदार सौ.श्वेता ताई विद्याधरजी महाले यांच्या शिवाय पर्याय नाही…तर येत्या २० नोव्हेंबर रोजी कमळ चिन्हावरती उभ्या भाजपा उमेदवार सौ.श्वेताताई विद्याधरजी महाले यांना बटन क्रमांक “४” दाबुन पुन्हा एकदा प्रचंड मतांनी विजयी करा…
आपलाच,
*@ पार्वतीनंदन चि.प्रा.गणेश बाहेकर*



