13 C
New York
Friday, December 19, 2025

Buy now

spot_img
spot_img

निवडणूक शपथपत्रातून झाले सत्य उघड. *पाच वर्षात राहुल भाऊच्या संपत्तीत झाली तब्बल 310 टक्के वाढ *अनं म्हणे माझ्याकडे एक इंच जमीन नाही.

माझ्याकडे आता एक इंच ही जमीन नाही म्हणणाऱ्या राहुलभाऊकडे 26 कोटी ,अकरा लाख ,19 हजार 882 रुपये एवढी संपत्ती ….

चिखली-उमेदवारी अर्ज भरताना भोळ्या भाबड्या जनतेसमोर आता माझ्याकडे एक इंचही शेती अथवा जमीन या ताई आणि साहेबांनी ठेवली नाही असा कांगावा करून चिखली विधानसभा मतदारसंघातील जनतेसमोर खोटे बोलून सहानुभूती मिळविण्याचा खोटारडा प्रकार त्यांनीच स्वतःच्या हस्ताक्षरात आणि सहीने निवडणूक शपथपत्रात दिलेल्या सत्य माहितीतून समोर आले असून राहुल भाऊ च्या परिवाराकडे २६ कोटी अकरा लाख 19 हजार 882 रुपयाची जंगम आणि स्थावर मालमत्ता असल्याचेही समोर झाले आहे. यातून ते जनतेसमोर किती खोटे बोलतात हे उघड झाले आहे. त्यांच्या या खोटं बोलण्याची चर्चा आता मतदारसंघात होऊ लागली आहे.
निवडणुकीत मते घेण्यासाठी जनतेला खोटी आश्वासने देऊन प्रचार करणारी काँग्रेसी संस्कृती चिखलीतही राहुल बोंद्रे यांनी सुरूच ठेवले आहे विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल सिद्धिविनायक बोंद्रे यांनी जाहीरपणे भाषण करताना खोटं बोलून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रकार केला या मंचावर महाविकास आघाडीतील सर्वच पक्षातील नेते होते यावेळी उपस्थित होते राहुल भाऊ म्हणाले की या ताई आणि साहेबांनी माझ्या तर सर्व प्रॉपर्टीवर आरक्षण टाकले आहे एक इंच ही शेती व जमिन ठेवली नाही सध्या मी भूमिहीन झालो आहे आणि याच वेळी या मंचावर बसलेले भूमिमुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे यांचे नाव घेऊन भाई तुमच्या पुढच्या कार्यक्रमाला मला बोलवा मी आता भूमीहीन झालो आहे आता माझ्याकडे एक इंच ही जमीन झालेली नाही असे बोलून चिखली विधानसभा मतदारसंघातील जनतेसमोर खोटं तर बोलले पण खोटे बोल पण रेटून बोल असा त्यांचा नेहमीचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी पार पाडला.
राहुल भाऊकडे एक इंच ही जमीन नाही या त्यांच्या स्वतः केलेल्या वक्तव्याची सत्यता पाहण्याखाली त्यांनी स्वतः निवडणुकी आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्र पाहिले असता त्यांनी सन 2019 मध्ये दिलेले शपथपत्र आणि 20 24 मध्ये दिलेले शपथ पत्र याची तुलना केली असता त्यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेत 310 टक्के वाढ झाल्याचे दिसून येते
2019 च्या शपथपत्रांमध्ये त्यांनी त्यांच्या कुटुंबाची जंगल मालमत्ता दोन कोटी 16 लाख 29 हजार सत्तावीस रुपये दाखवली होती तर 2024 च्या शपथपत्रात जंगम मालमत्ता पाच कोटी 61 लाख 24 हजार 612 दाखवली आहे त्यामध्ये या पाच वर्षाच्या कालावधी त्यांच्या जंगम मालमत्तेत 3 कोटी 44 लाख 95 हजार 585 रुपयाची वाढ झाली आहे तर 2019 च्या शपथपत्रात स्थावर मालमत्तेमध्ये त्यांनी सहा कोटी नऊ लाख 97 हजार पाचशे रुपये दाखवले होते ते आता 2024 च्या शपथपत्रात वीस कोटी 49 लाख 95 हजार 270 दाखवलेले आहे. स्थावर मालमत्तेमध्ये 14 कोटी 39 लाख 97 हजार 770 रुपयाची वाढ झालेली आहे जंगम आणि स्थावर मालमत्तेमध्ये तब्बल 17 कोटी 84 लाख 93 हजार 355 रुपयाची वाढ झाली आहे.
2019 च्या शपथपत्रातील जंगम व स्थावर मालमत्ता 8 कोटी 26 लाख 26527 वरून 2024 च्या शपथपत्रात ती 26 कोटी 11लाख 19 हजार 882 अशी झाली आहे ही वाढ टक्केवारीत मोजल्यास पाच वर्षात राहुल भाऊच्या संपत्तीमध्ये 310 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
शपथपत्रावर राहुलभाऊ तीनशे दहा टक्के वाढ झाल्याचे शपतेवर लिहून देतात तेच राहुल भाऊ त्याच शपथपत्रासह अर्ज भरतेवेळी जनता जनार्दनासमोर बोलताना माझ्याकडे एक इंच ही शेत जमीन नसल्याचे जाहीर सांगून किती खोटे बोलतात हे या शपथपत्रावरून समोर येत आहे

खोटं बोल पण रेटून बोल….
अशा स्वरूपाचे भाषण राहुल भाऊ मतदारसंघात करत असतात आणि खोटे बोल पण रेटून बोल असा त्यांचा नेहमीचा खाक्या वापरून जनतेची दिशाभूल करतात जनतेने आता त्यांचे शपथपत्र पाहून तरी राहुल बोंद्रे यांच्या खोटं बोल पण रेटून बोल या वृत्तीला बळी पडू नये असे आता सुज्ञ मतदार बोलत आहेत.

मतदारांचा एकच सवाल..
खोटे बोलणाऱ्या वर विश्वास कसा ठेवायचा…..
विश्वास ठेवा बदल होईल असे घोषवाक्य घेऊन काही दिवसापूर्वी राहुल बोंद्रे जनतेसमोर गेले होते मात्र शपथपत्रात खरं सांगणारे जनतेसमोर खोटे बोलतात यामुळे जनता आता राहुलभाऊ विश्वास कसा ठेवायचा असा सवाल विचारत आहे

Related Articles

ताज्या बातम्या