4.2 C
New York
Thursday, April 9, 2026

Buy now

spot_img
spot_img

राहुल बोन्द्रे म्हणजे “कन्फ्युजन ही कन्फ्युजन है! सोलुशन कुछ पता नही!…..शिवराज पाटील.

राहुल बोन्द्रे म्हणजे “कन्फ्युजन ही कन्फ्युजन है! सोलुशन कुछ पता नही!…..शिवराज पाटील

चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल बोंद्रे हे तीन दिवसापासून,काही व्यक्तींचे मतदार यादीतील नावे गहाळ झाली असल्याचे आरोप करताना दिसत आहेत.हा आरोप करताना ते वारंवार मुस्लिम, मागासवर्गीय व महाविकास आघाडीला मतदान करणारे हिंदू मतदार यांची नावे प्रामुख्याने गहाळ झाली असल्याचे सांगत आहेत.वारंवार जातींच्या उल्लेख करून समाजाला जातीच्या आधारावर विभाजित करून त्याचा राजकीय फायदा करून घेण्याचा उद्देश तर यामागे नाही ना? निवडणूक आयोगाकडून काही चुका झाल्या असतील तर त्याची तक्रार करणे योग्य आहे परंतु तक्रार करत असताना वारंवार जातीचा उल्लेख करून,त्या जातीचे लोक आपली हक्काची वोटबँक बनवण्यासाठी व आपल्या विरोधकांना ते मतदान करणार नाही याची तजवीज तर केली जात नाही?असा संशय भाजपाचे शिवराज पाटील यांनी व्यक्त केला आहे.

त्यासंबंधी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना उचित तक्रारही त्यांनी दिली असल्याची कळते.आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्याकडे याबाबतीत योग्य ते सर्व पुरावे असल्याचे ते एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.परंतु योग्य ते पुरावे असतांनाही राज्य काँग्रेस कमिटी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटी यांच्यातर्फे भारतीय निवडणूक आयोगाला तक्रार का देण्यात आली नाही? याबद्दल पत्रकारांनी विचारले असता,बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी निरीक्षक म्हणून आलेले राजस्थान येथील श्री गुर्जर तसेच माजी आमदार राहुल बोन्द्रे यांची उत्तर देतांना बंभेरी उडालेली दिसली. राज्य काँग्रेस कमिटी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटी यांना राहुल बोंद्रे यांच्या बद्दल विश्वास नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.असेही आमदार बंधू शिवराज पाटील म्हणाले.

मतदार संघात घडणाऱ्या कोणत्याही बाबीसाठी उपमुख्यमंत्री कार्यालय व उपमुख्यमंत्री यांचे स्वीय सचिव यांना जबाबदार धरत असल्यामुळे, विद्याधर महाले यांची इमेज राहुल बोंद्रे स्वतःच्या पैशाने मोठी करत असल्याचा व स्वतःपेक्षा महाले कुटुंबाचा प्रचार जास्त करत असल्याच्या चर्चा त्यांचेच कार्यकर्ते आता करायला लागले आहेत.राहुल बोंद्रे यांच्या सोशल मीडिया सेलवर देखील आमदार असलेल्या श्वेताताई महाले यांच्यावर टीका केली जात नसून, श्री विद्याधर महाले यांच्यावर वैयक्तिक टीका केली जात आहे.त्यामुळे विद्याधर महाले यांनी राहुल बोंद्रे यांच्या मनात अशी कोणती भीती बसवली आहे? याबद्दल कुतुहल निर्माण होत आहे.असा टोलाही शिवराज पाटील यांनी ठेवून दिला.

Related Articles

ताज्या बातम्या