13 C
New York
Friday, December 19, 2025

Buy now

spot_img
spot_img

जयश्रीताईंचा पत्ता कट…..?? बुधवत यांना “पुढच्या वेळेस पाहू” ? कोण असेल महाविकास आघाडीचा नवीन आयात उमेदवार?

मागील वीस वर्षापासून सतत अनेक सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहून स्वतःच्या कर्तुत्वाचा एक अमोघ ठसा समाजावर उमटवणाऱ्या जयश्री ताईंना यावेळेस तिकीट मिळेल मिळेल असे वाटत असतानाच राजकीय संकेत काही वेगळेच दिसत आहेत.

काही दिवसापूर्वी बाळासाहेब थोरात या महाराष्ट्रातील काँग्रेसच्या तिकीट वाटपात महत्त्वाची भूमिका असलेल्या मातब्बर नेत्यांने “रविकांत तुपकर यांनी अडीच लाख मते घेऊन स्वतःला अगोदरच सिद्ध केले” अशी तुपकरांची तारीफ केली

बाळासाहेब थोरात यासारख्या मातब्बर काँग्रेस पुढाऱ्याने रविकांत तुपकर यांची पाठ थोपटणे हे काही सामान्य बाब नाही, तसं बघितलं तर जयश्रीताई शेळके यांना हा “घरचा आहेर” आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

त्यात शिवसेना उबाठा कडून, बुलढाणा विधानसभा मतदारसंघ तिकिटासाठी दारोदार फिरत असलेले जालिंदर बुधवत यांना शिवसेना उबाठा कडून लवकरच “पुढच्या वेळेस पाहू” असा निरोप मिळण्याची दाट शक्यता आहे.पक्षाच्या सर्वेमध्ये “निवडून येण्याची शक्यता” या तत्वात ते बसत नसल्याबद्दल,तसेच आमदार संजय गायकवाड यांचेसोबत त्यांचे कनिष्ठतत्व स्वीकारून असलेले प्रिय संबंध,वरिष्ठाना मान्य होण्यासारखे नसल्याचे सांगण्यात येत आहे.जातीय आधार या मुद्द्यावरही ते निकषामध्ये बसत नसल्याबद्दल चर्चा आहेच.या वेळेस रविकांत तुपकर यांनी जालिंदर बुधवत यांचा गेम केल्याची चर्चा आहे.

अशाप्रकारे महाविकास आघाडी कडून सीट काँग्रेसला सुटते? की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला? ज्याला सीट सुटेल तो ती रविकांत तुपकर यांना सन्मानाने ताटात सजवून देण्याच्या तयारीत सगळे पक्ष आहेत.म्हणजे रविकांत तुपकर यांच्याकडूनच आमदार संजय गायकवाड यांची “राजकीय शिकार” करण्याची तयारी महाविकास आघाडीने केली आहे.फक्त रविकांत तुपकर यांनी शिवबंधन बांधावे अशी अट असल्याचे कळत आहे.अशातच जयश्रीताई यांनीसुद्धा शिवबंधन बांधल्यास त्यांचाही विचार होऊ शकतो.पण तरीही अग्रक्रम रविकांत यांनाच मिळणार अशी सूत्र माहिती आहे.

अशाप्रकारे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात उभे राहण्याकरता तिकीट मिळवण्यासाठी कार्यरत असलेले मातब्बर जयश्रीताई शेळके व जालिंदर बुधवत या दोघांचाही पत्ता कट होऊन “शिवबंधित रविकांत” हे महाविकास आघाडीकडून नवीन आयात उमेदवार असू शकतात असे खात्रीलायक सूत्र आहे…

 

पुढचा भाग…..

Related Articles

ताज्या बातम्या