चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये गत काही महिने सुरू असलेला राजकारणाचा फड आता छत्रपती संभाजीनगर,व पुणे येथे रंगणार असून, छत्रपती संभाजीनगर व पुणे येथील चिखलीकर मतदार या राजकारण्यांना कसा प्रतिसाद देतात हे पाहणे मजेशीर असणार आहे.
चिखली शहर व चिखली मतदारसंघातून हजारो युवक व शेकडो कुटुंब काम,उद्योग,शिक्षण व इतर कारणासाठी संभाजीनगर व पुणे या ठिकाणी तात्पुरते किंवा कायमस्वरूपी स्थायिक झाले आहेत, किंवा वास्तव्याला आहेत.छत्रपती संभाजी नगर व पुणे या दोन्ही शहरा मिळून नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षण इत्यादी बाबींसाठी चिखली शहर व मतदार संघातून दहा हजारापेक्षा अधिक संख्येने लोक राहतात.परंतु त्यांचे अद्यापही आपल्या गावातील म्हणजे चिखली मतदारसंघातील मतदार यादीमध्ये नाव आहे,ही संख्या प्रत्यक्षात खूप जास्त असू शकते.
आतापर्यंत मतदानाच्या एका दिवसाकरता घरी जाऊन यायचे तर, प्रवासखर्च, प्रवासाचा थकवा, व आपल्या एका मतदानाने काय फरक पडणार आहे? ही मानसिकता यामुळे या दोन्ही व इतरही शहरामध्ये राहणारी जनता सुज्ञ असूनही मतदानासाठी येऊ शकत नव्हती.परंतु चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले व त्यांचे संभाव्य विरोधक माजी आमदार राहुल बोंद्रे या दोघांनीही या प्रचंड संख्येने असलेल्या मतदानाला आकर्षित करण्यासाठी या शहरामध्ये जाऊन स्नेहमीलन आयोजित केले आहे.
हेतू जरी राजकीय असतील तरी, गाव सोडल्यानंतर एकदम परकेपणाची भावना घेऊन, परक्या शहरात राहणाऱ्या या मंडळीना, एकत्र येण्यासाठी व आपल्या जवळ,आपल्या आसपास, आपल्या शहरातील, आपल्या मतदारसंघातील कुणीतरी राहतो हे मानसिक पाठबळ मिळण्यासाठी, त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी ही बाब अतिशय उपयुक्त ठरू शकते.
नाही म्हटले तरी ह्या अप्रत्यक्ष प्रचार सभाच आहेत हे सगळ्यांना कळते.पण यातून मतदानाची टक्केवारी वाढत असेल! एकमेकांशी ओळखी वाढत असतील!एकमेकांशी ओळखीतून काही नवीन संधी निर्माण होत असतील!आणि परकेपणाची भावना नष्ट होऊन तिथे राहणाऱ्या लोकांना एकत्र येण्याची व आपले विचार मांडण्याची संधी मिळत असेल तर नक्कीच ताई व भाऊ यांचे कौतुकच केले पाहिजे!
आमदार व माजी आमदार दोघेही आपला संभाव्य लीड वाढण्यासाठी प्रयत्न करत आहेत,हे जरी ठीक तरी पुण्यात आमदार सौ. महाले यांचे पती असलेले श्री विदयाधर महाले यांनी मागील पाच वर्षात हजारो युवकांना शिक्षण व नोकरी यासाठी आवश्यकतेप्रमाणे मदत करून जी “मिनी यंत्रणा” उभी केली आहे,त्याला भेदन्याचे महत्कार्य राहुल बोन्द्रे कसे करतात? ते पाहणे मजेशीर असेल.



