बुलडाणा:गणेशोत्सव काळात मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी अनेक राजकीय नेते व सेलिब्रिटीज येत असतात,
आज मंगळवार 10 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता केंद्रीय आयुष्य व आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे लालबाग संस्थानचे विश्वस्त व उपाध्यक्ष यांनी स्वागतही केले.
याप्रसंगी केंद्रीय मंत्री महोदयासमवेत प्रा.सचिन जाधव, गोपाल डिके, सार्वजनिक आरोग्य विभाग संचालक सोहम वायाळ व कांता पाटील वायाळ यांनीही लालबाग राजाचे मनोभावे दर्शन घेतले.




