-0.5 C
New York
Thursday, February 12, 2026

Buy now

spot_img
spot_img

उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त करत चिखलीत उद्या सर्वपक्षीय बंदचे आवाहन

उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त करत चिखलीत उद्या सर्वपक्षीय बंदचे आवाहन…

महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षितिजावर लखलखणारा तारा आज कायमचा मावळल्याची भावना व्यक्त होत असून, या काल्पनिक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत अकाली निधन झाल्याच्या वृत्तामुळे चिखली शहर व चिखली विधानसभा मतदारसंघात तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर उद्या दि. 29 जानेवारी 2026 गुरुवार रोजी चिखली शहर व चिखली विधानसभा मतदारसंघात सर्वपक्षीय बंद पाळण्यात यावा, असे आवाहन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे यांनी संयुक्तपणे केले आहे.

या दुःखद घटनेबाबत शोकभावना व्यक्त करताना आमदार श्वेता महाले पाटील म्हणाल्या की,“हा आघात मनाला सुन्न करणारा आहे. दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत. स्वतःच्या कर्तृत्वाने, विचारांनी आणि जनतेप्रती असलेल्या अपार आपुलकीने ज्यांनी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात अमिट ठसा उमटवला, अशा महान व्यक्तिमत्त्वाचे जाणे ही राज्यासाठी आणि समाजासाठी न भरून न येणारी हानी आहे. त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे स्मरण सदैव प्रेरणादायी राहील.”

या सर्वपक्षीय बंदाच्या माध्यमातून दिवंगत नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी व शांततेत शोक व्यक्त करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे…

Related Articles

ताज्या बातम्या