4.2 C
New York
Thursday, April 9, 2026

Buy now

spot_img
spot_img

राहुल बोंद्रेंच्या ‘आशीर्वादाने’ चिखलीत गुन्हेगारीचे जाळे? ….

राहुल बोंद्रेंच्या ‘आशीर्वादाने’ चिखली मतदारसंघात गुन्हेगारीचे जाळे?

राहुल बोंद्रे यांच्या निकटस्थ व्यक्तींमध्ये गुन्हेगारी मानसिकता?

चिखली तालुक्यातील उदयनगर येथे न्यायालयीन आदेशामुळे अपात्र ठरलेला माजी सरपंच मनोज लाहुडकर याने कायद्यालाच आव्हान देत गुन्हेगारीचा कळस गाठल्याचा दिसून येत आहे.अगोदरच पाच गुन्हे नावावर असलेल्या मनोज लाहुडकर याने उदयनगर मध्ये पुन्हा दहशत माजवन्याचा प्रयत्न केला असून,राजकीय आश्रय असल्याने आपले कुणी काही बिघडवू शकत नाही! असा संदेश देण्याचा आणी समाजात दहशत पसरविण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा जनमाणसात सुरु आहे.

अलीकडेच मनोज लाहुडकर व त्याच्या भावकीतील इतर सदस्यांनी उदयनगर येथील शुभम राऊत या युवकावर लाठ्या-काठ्या, वाहनाचा सायलेन्सर पाईप यांसारख्या घातक शस्त्रांनी निर्घृण मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल झाले असून,अटकेच्या भीतीने मनोज लाहुडकर फरार असल्याचे समजते.

या दोन घटनांमुळे चिखली विधानसभा मतदारसंघात माजी आमदार व जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याकडून गुन्हेगारीला खतपाणी घातले जात असल्याची चर्चा या पार्श्वभूमीवर या आरोपामुळे जोर धरू लागली आहे.

राहुल बोन्द्रे सत्तेत असतांना त्यांचा “विशेष आशीर्वाद” व “वरदहस्त” मिळाल्यामुळेच संबंधित मंडळींमध्ये कायद्याची भीतीच उरली नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या राजकीय आश्रयामुळे लाहूडकर सारखे गुन्हेगार निर्ढावले आहेत का?, चिखली विधानसभा मतदारसंघात गुन्हेगारी व गुन्हेगाराला अभय देऊन मुद्दाम मतदारसंघाचे नाव खराब करण्याचा प्रयत्न सुरू नाही ना?

संबंधित सर्व प्रकरणांचा जलद तपास करून दोषींना तात्काळ अटक करावी आणि कोणताही राजकीय दबाव न घेता कठोर कारवाई करावी,जेणेकरून सामान्य नागरिकांमध्ये कायद्यावरील विश्वास पुन्हा प्रस्थापित होईल…अशी मागणी जन माणसातून केली जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या