0.7 C
New York
Friday, February 13, 2026

Buy now

spot_img
spot_img

निलेश गावंडे यांची ‘अस्तित्व सिद्धी’ की ‘अस्तित्व समाप्ती’…?

निलेश गावंडे यांची ‘अस्तित्व सिद्धी’ की ‘अस्तित्व समाप्ती’…?

चिखली नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या, अपेक्षेप्रमाणे लढत तिरंगी झाली परंतु विधानसभेमध्ये ज्या शहराने आमदार श्वेता महाले यांचे नेतृत्व झिडकारले होते त्या शहराने आपली चूक दुरुस्त करत आमदार श्वेता महाले यांच्यावर विश्वास दाखवून त्यांचे शिलेदार पंडितराव देशमुख यांना विजयी केले.

या निवडणुकीला कोणत्याही जातीय किंवा सामाजिक समीकरणात मांडता येत नाही, ही निवडणूक बऱ्याच अंशी नेतृत्वाचा चेहरा आणि पैसा या भोवती केंद्रित झालेली दिसली.

विधानसभा निवडणुका झाल्यानंतर अवघ्या एका वर्षामध्ये आमदार श्वेता महाले यांनी आपल्या हक्काच्या मतांव्यतिरिक्त 8000 पेक्षा जास्त मतांची बेगमी चिखली शहरात घडवून आणली, तर विधानसभेमध्ये जवळजवळ 6000 मतांनी आघाडीवर असलेले राहुल बोन्द्रे यांनी स्व केंद्रीत राजकारण ठेवण्याच्या नादात व घराणेशाही जपण्याच्या अट्टाहासापायी आपल्या पायावर धोंडा मारून घेतला.

प्राचार्य निलेश गावंडे यांना पाच वर्षापासून तिकिटासाठी ताटकळत ठेवून वेळेवर तिकीट नाकारणाऱ्या राहुल बोन्द्रे यांनी एका दगडात काशिनाथ आप्पा, कुणाल बोन्द्रे आणी निलेश गावंडे हे तीन पक्षी मारले आणि स्वतःला स्पर्धा होऊ दिलीच नाही अशीच चर्चा चिखलीच्या वर्तुळात सुरू आहे.

निवडून येण्याची क्षमता असलेल्या प्राचार्य निलेश गावंडे आणि कुणाल बोंद्रे यांना तिकीट न देता मुद्दाम काशिनाथ बोंद्रे यांना तिकीट देण्यात आले. कुणाल बोंद्रे यांची स्थिती म्हणजे ‘बाप खाऊ देईना, आणि माय भिक मागू देईना’ अशी झाली. त्यात प्राचार्य गावंडे यांची अवस्था ‘तेलही गेले आणि तूपही गेले, हाती अजित पवारांचे धुपाटणे आले.अशी झाली.

प्राचार्य निलेश गावंडे यांनी आपल्या व्यक्तिगत महत्त्वकांक्षाना प्रचंड स्वरूप देत, राहुल बोंद्रे व काँग्रेस पक्षाला धडा शिकवण्यासाठी क्षणात पक्ष बदलून उभे राहण्याचा व निवडून येण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु त्यांच्या या प्रयत्नामध्ये त्यांना असलेल्या मर्यादा कुणी सांगितल्या नाही म्हणा किंवा त्यांच्या अवतीभवती असलेल्या सल्लागारांनी फुगवून त्यांना मोठे केले असे म्हणता येईल.

मराठा चेहरा म्हणून भाजपकडून निलेश गावंडे यांना नगराध्यक्ष पदाकरता बोलावने होते असे ऐकण्यात आहे. अशा वेळेस त्यांनी राहुल बोन्द्रे यांच्यावर विश्वास ठेवत काँग्रेसला साथ देण्याचा प्रयत्न केला, परंतु चिखलीतील बहुतेक जणांना जे अगोदरच माहिती होते ते निलेश गावंडे यांना कळाले नाही याबद्दल त्यांची दया येते.

तरीही निलेश गावंडे यांनी शहरांमध्ये जवळपास आठ हजार मते घेतली ज्यापैकी बरीचशी मते त्यांचा अगोदरचा मतदारसंघ व भाजपाचे मतदारसंघ असलेल्या प्रभागातूनच त्यांना मिळाली आहेत, त्यांच्या सुविद्य पत्नी देखील निवडून आल्या आहेत. त्याचबरोबर ते आता महायुतीचा घटक देखील आहेत, अशा वेळेस कदाचित महायुतीचा घटक असल्यामुळे त्यांची सन्मानजनक पदस्थापना करण्यात येईल अशी आशा आहे… परंतु याबाबत कुठलीच खात्री नसल्याने ही निवडणूक प्राचार्य निलेश गावंडे यांच्या अस्तित्व सिद्धीची ठरते की या निवडणुकीत सोबत त्यांचे अस्तित्व समाप्ती होते ते लवकरच कळेल…

Related Articles

ताज्या बातम्या