4.2 C
New York
Thursday, April 9, 2026

Buy now

spot_img
spot_img

आमदार श्वेता महाले पाटील यांच्या विशेष परिश्रमामुळे ‘परिवर्तन प्रकल्प’ राबविण्याचा मार्ग मोकळा

चिखली तालुक्यातील २० गावांच्या सर्वांगीण विकासाला चालना :

  1. आमदार श्वेता महाले पाटील यांच्या विशेष परिश्रमामुळे ‘परिवर्तन प्रकल्प’ राबविण्याचा मार्ग मोकळा

 

चिखली (प्रतिनिधी) :

चिखली तालुक्यातील गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आता नवा अध्याय सुरू होणार आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये शाश्वत व व्यापार सामाजिक-आर्थिक ग्रामीण विकास साध्य करण्यासाठी ‘परिवर्तन प्रकल्प’ हाती घेण्यात आला असून, HDFC CSR अंतर्गत पुढील पाच वर्षांसाठी हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

 

या प्रकल्पांतर्गत चिखली तालुक्यातील २० गावांची निवड करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहेत :

आंधई, भरोसा, चंदनपूर, चांधई, दहीगाव, धोत्रा भांगोजी, गांगलगाव, गीरोला, काटोडा, कवठळ, केळवद, खैरव, कोलारा, कोलारी, मेरा खुर्द, रामनगर, रोहडा, सातगाव भुसारी, सोनेवाडी आणि उत्रादा.

ही गावे एचडीएफसी CSR (HDFC CSR) कडून निवडण्यात आली असून, या गावांमध्ये WOTR संस्था जिल्हा प्रशासनाच्या मदतीने ग्रामविकास आराखडे (GPDP) तयार करणार आहे. या आराखड्यांत POCRA योजनेसह शासनाच्या इतर महत्वाच्या योजनांचे समन्वयाने अंमलबजावणी होणार आहे.

 

या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा लाभ चिखली तालुक्यातील शेतकरी, ग्रामस्थ, महिला व युवकांना मिळावा, यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ. श्वेता ताई महाले पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच या परिवर्तन प्रकल्पात चिखली तालुक्याचा समावेश निश्चित झाला असून, यामुळे तालुक्यातील ग्रामविकासाला नवे बळ मिळणार आहे.

 

शाश्वत शेती, जलसंधारण, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि आर्थिक स्वावलंबन या सर्व क्षेत्रांत या प्रकल्पाचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

 

ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासाला गती देण्यासाठी आमदार श्वेता महाले पाटील यांचे प्रयत्न कौतुकास्पद ठरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या