4.2 C
New York
Thursday, April 9, 2026

Buy now

spot_img
spot_img

चिखलीत लवकरच उभे राहणार ‘पोलीस पाटील भवन’

चिखली :

चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या प्रयत्नातून चिखली शहरात ‘पोलीस पाटील भवन’ उभारण्याचा शुभारंभ आज भूमिपूजनाने झाला.

 

प्रभाग क्र. 5 मधील चिखली पोलीस स्टेशनच्या आवारात तब्बल 50 लक्ष रुपयांचा खर्च या अत्याधुनिक भवनासाठी करण्यात येणार असून, पोलिस पाटील, सरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्षांसाठी हे भवन सोयीचे ठरणार आहे.

 

या प्रसंगी आमदार सौ. श्वेता महाले पाटील म्हणाल्या, “पोलीस पाटील हे गाव पातळीवरील कायदा व सुव्यवस्थेचे पहिले शिलेदार आहेत. त्यांच्या कार्यामुळेच गावामध्ये शिस्त, शांतता व समन्वय टिकून राहतो. आजपर्यंत या बांधवांकडे सोयीसुविधांकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळेच त्यांच्या सन्मानासाठी आणि कार्यसुलभतेसाठी हे ‘पोलीस पाटील भवन’ उभारले जात आहे. हे भवन केवळ भिंतींचे नसून पोलिस पाटील बांधवांच्या आत्मविश्वासाचे प्रतीक ठरेल.”

 

या भव्य सोहळ्यास भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रतापसिंग राजपूत, ठाणेदार श्री. भूषण गावंडे, श्री. संजय गाडेकर (जिल्हा उपाध्यक्ष भाजप), श्री. रफिक शेठ, श्री. सागर पुरोहित (शहराध्यक्ष भाजप), श्री. मिलिंद इंगळे यांच्यासह पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या