सुमारे दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला हा लेख त्यावेळी सुमारे पन्नास हजार लोकांनी वाचला होता, जयश्री शेळके यांनी विधानसभा निवडणुकीबाबत न्यायालयात जी याचीका दाखल केली त्याने आमदार संजय गायकवाड पुन्हा प्रकाश झोतात आले आहेत त्यामुळे त्यांचे कॅन्टीन केसरी व बॉक्सिंग चे प्रकरण टाळून हा लेख पुन्हा प्रकाशित करत आहे.
आ.संजय गायकवाड हे बुलढाण्याच्या पटलावर गाजत,वाजत व सजत असलेलं नावं मागील सहा वर्षांपासून पाहणारी समग्र बुलढाणा जिल्ह्याची जनता आता संजूभाऊ या नावासमोर आमदार ऐवजी “नामदार” पाहण्यास उत्सुक आहे.
संजय गायकवाड हे नाव शहरी सुशिक्षित लोकांमध्ये विशेष आवडीचे नाही कारण शहरी सुशिक्षितामध्ये असणारा तथाकथित सुसंस्कृतपणा,बोलण्या चालण्यातील संस्कारीत भाषा,ओढूनतढून आणलेला आदर हे काहीच या माणसात पाहायला मिळत नाही तर राहण्याची आपली शैली व मनात येईल त्या त्या वेळेला मनात असेल ते बोलून टाकण ही संजूभाऊंची शैली आणी यापायीच ते ग्रामीण भागात मात्र प्रचंड लोकप्रिय आहेत,
ते राज्याच्या तत्कालिन विरोधी पक्ष नेत्याला “मला जर कोरोणाचे जंतू भेटले तर त्यांच्या तोंडात कोंबले असते ” अस म्हणण असो की, शेतकऱ्यांनी दोन वर्ष माल ठेवून त्यांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी नेत्याला ह***** म्हणणे असो.
“पंच्यान्नव टक्के कर्मचारी हरामाची कमाई/बाहेरची कमाई खातात” अस बोलताना सत्य आहे ते बोलताना ते कधी मतांचा हिशोब करत बसत नाहीत व ज्या संघटनाना साक्षात सरकारही नमस्कार घालूनच बोलत त्या कर्मचारी संघटना व त्यांच्या भाडोत्री नेत्यांना हा सर्वसामान्याचा नेता “केसाची” पण किंमत देत नाही
आपली नैसर्गिक भूमिका सांगताना मनाचा धर्म पाळणारा हा बुलढाण्याचा “धर्मवीर “, युतीचा धर्म गड्ड्यात घालून ” काही झाल तरी बुलढाण्याचा पालकमंत्री राष्ट्रवादीचा होऊ देणार नाही ” हे स्पष्टच सांगतो.
हा माणूस कोरोनाच्या काळात जीव वाचला तर बाकी सगळ्या गोष्टी नंतर करता येतील म्हणून जर गरज असेल तर अंडी,चिकन,मटण खा अस बोलून जातो अन मग् “लोकांची चिंता करणारा खरा वारकरी असतो “अस ठणकावून सांगून बोगस वारकऱ्यांनाही शिंगावर घेतो
हा माणूस बोगस प्रश्नांना एका शब्दात उत्तर देतो अन फैसला जागेवरच् म्हणून आदित्य ठाकरेला “गुवाहाटिचा खर्च मीच केला मग काय?” म्हणून, तुम्हाला जे करण शक्य आहे ते घ्या करून असंच अप्रत्यक्षपणे सांगतो तर ,संजय राऊताला कुठ भेटायचं सांग? अस प्रत्यक्ष कॅमेरावरच सांगतो.
हा माणूस वाढदिवसाला “चला हवा येऊ द्या” पण आणतो,कार्यकर्त्यासोबत् हा माणूस भीमजयंतीला आंनदाने नाचतो तर शिवजयंतीला शिवचरणी आदराने माथाही टेकवतो,त्यांनी त्यांच्या वाढदिवसाला लावलेले प्रचंड फ्लेक्स लोकांच्या चर्चेचे विषय होतात पण आमदार झाल्यानंतर एवढा वाढदिवस कार्यकर्त्यांना एकत्र आणून आनंद साजरा करण्यासाठी,कार्यकर्त्यांच्या इच्छेला मान म्हणून समजावून घेता येतो,खर्च लोकांच्या डोळ्यात येतो पण त्याच कार्यक्रमात गिफ्ट भेटलेली 60 लाखाची गाडी हा माणूस नम्रपणे नाकारतो.
पण कोणत्याही अधिकृत पदावर नसलेल्या त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाला त्यांच्या वाढदिवसापेक्षा दुप्पट फ्लेक्स लागतात,आमदाराच्या कोणत्याही फ्लेक्समध्ये आमदाराखालोखाल त्यांच्या मुलाचा फोटो लागतो अन एकट्यात बक्कळ चर्चा करणारे पत्रकार,विरोधी पक्षाचे सुमडी नेते, कुणीच तोंडावर वा माध्यमामधून काहीच म्हणत नाही “ये डर हमे अच्छा लगा” एवढच नाही तर त्यांच्या प्रतिक्रियेवर उत्तर देताना सुद्धा माजी आमदार,विविध महामंडळाचे अध्यक्ष राहिलेले नेते,जी. प. चे अध्यक्ष वा विधानपरिषद आमदार सुद्धा सरळ सरळ संजूभाऊचे नाव कधीच घेत नाही,म्हणजे एकतर संजूभाऊ म्हणतात ते बरोबर असावे किंवा पुन्हा तेच “ये डर हमे अच्छा लगा”
संजूभाऊ कार्यकर्त्यांना समजावून घेतात, संजूभाऊ आजारी कार्यकर्त्यांना कोरडी सहानभूती देत नाहीत तर सरळ जी मदत होत असेल ती करतात,संजूभाऊ गरीब रस्त्यावरच्या म्हातारीलाही भेटतात व खिशातील 500 रुपये देऊन तिची श्रावणबाळ केसही करून देतात म्हणजे तिला पुन्हा कुणासमोर हात पसरायची गरज पडणार नाही,संजूभाऊ माळी सरांना समजावूनही सांगतात, अन मग ते संजय कुटे असले तरी प्रत्येकाला “ये बुलढाणा मेरा है और मै इस बुलढाणेका” अस सिंघम स्टाईल ने सांगून “बाहर का कचरा और मेरा पुतळा यहा जलाने नही दूंगा” अस सिद्ध करून दाखवतात सत्तेतल्या लोकांचेही गर्वहरण करताना “कोण कुठल्या बारमध्ये नाचताना बायावर पैसे उधळतो” हे बोलून मेरे पास हर ताले की चाबी है हे दाखवून देतात.
अशा या धर्मवीर संजूभाऊ बद्दल सांगताना लेखाची मर्यादा पाळून काही गोष्टी सांगता येणार नाहीत पण “अंगात रक्त अन रक्तात धमक असलेला” हा नेता संघर्षातून आमदार झाल्यामुळे अजूनही जनतेशी नाळ जोडून आहे……



