‘रेणुका मातेच्या’ मिरवणुकीसाठी ‘लेकीचे’ नियोजन…
चिखलीचे आराध्यदैवत असलेल्या रेणुकामाता यात्रेच्या अनुषंगाने आज चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी संबंधित अधिकारी व नियोजनात महत्वपूर्ण भूमिका असलेल्या कर्मचारी, पदाधिकारी यांची बैठक घेतली. रेणुकामाता दर्शन व यात्रेसाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे व त्यांच्या चिजवस्तूंचे रक्षण आणी संवर्धन करण्याची नैतिक जबाबदारी आपल्या सर्वांची असून यासाठी काही महत्वाचे मुद्दे त्यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडले.
दि. 12/04/2025 रेणुकादेवी यात्रा महोत्सव चिखली प्रशासनाने करावयाची कार्यवाही आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी लिखित स्वरूपात प्रशासनाला दिली.
1) यात्रेदरम्यान *नगरपालिकेच्या* वतीने गर्दीच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
2) वहन मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व पथदिवे व शहरातील सर्व पथदिवे, महापुरुषांच्या पुतळ्याजवळील दिवे, नगरपालिकेने सुरू ठेवावेत. व नगरपालिकेचा विद्युत विभागाचा सर्व कर्मचारीवर्ग अलर्ट मोडवर उपस्थित ठेवावा.
3) नगरपालिका अग्निशामक विभागाकडे असलेले सर्व अग्निशामक वाहने पाणी भरून सज्ज ठेऊन, सर्व कर्मचारी अलर्ट मोडवर उपस्थित ठेवावेत.
5) पोलिस प्रशासनाने कायदा सुव्यवस्था चोख राखावी. रेणुकादेवी परिसर तसेच वहन मिरवणूक मार्गावर वॉकीटॉकीसह कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात यावी. सीसीटीव्ही सर्वेलन्स रूम सज्ज ठेवावी. गुप्तवार्ता विभागाला सक्रिय करावे. पुरुष तसेच महिला पोलिसांची अतिरिक्त कुमक ठेवावी. क्विक रिस्पांस टीम सज्ज ठेवावी.
6) ग्रामीण रुग्णालय चिखली व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांचे वतीने संभाव्य गर्दी लक्षात घेता तात्काळ प्रतिसाद टीम सज्ज ठेवाव्यात. संबधित वैद्यकीय अधिकारी रात्री कर्तव्यावर हजर ठेवावे. सर्व रुग्णवाहिका सुसज्ज ठेवाव्यात. आवश्यकता भासल्यास इतर ठिकाणच्या अतिरिक्त रुग्णवाहिकांची सेवा घेण्यात यावी. पुरेसा अनुषंगीक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात यावा.
7) यात्रा कालावधी दरम्यान शहर व परिसरातील विद्युतपुरवठा अखंडित व पुरेशा दाबाने राहील याची व्यवस्था महावितरण विभागाने करावी. शहरातील सर्व अधिकारी, कर्मचारी सतर्क मोडवर ठेवावेत. शहरातील सुट्टीवर असलेल्या तसेच रिक्त जागेवर यात्रा कालावधीसाठी इतर ठिकाणचा कर्मचारी वर्ग बोलवन्यात् यावा. यात्रा कालावधी दरम्यान पावरस्टेशन चिखली व महापारेषन शी समन्वय राखून महावितरणने काम करावे.
8) यात्रा कालावधी दरम्यान पंचायत समिती कार्यालयासमोर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पंचायतसमितीने करावी.
9) यात्रा कालावधी दरम्यान तहसीलदार चिखली यांनी सर्व संबधित यंत्रणामध्ये समन्वय राखून सनियंत्रण करावे. स्वतः पाहणी करून संबधित यंत्रनांना उचित निर्देश द्यावेत.
रेणुकामाता यात्रेसाठी जमणाऱ्या सर्वांची यात्रा व दर्शन सुखकारक आणी सुरक्षित व्हावे यासाठी सर्वांनी आपल्या नेमून दिलेल्या कर्तव्याची योग्य अंमलबजावणी करावी असे आदेश आ. सौ. श्वेताताई महाले यांनी दिले.



