- ना राग,ना खंत….पुन्हा विकासकामांचा धडाका सुरु….
आ.श्वेताताई महाले यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय चिखली येथे कर्करोग तपासणी उपकरण लोकार्पण सोहळा…
श्वेताताई महाले यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय चिखली येथे कर्करोग तपासणी उपकरण लोकार्पण सोहळा…
ग्रामीण रुग्णालय चिखली येथे आमदार मा.श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नाने प्राप्त झालेल्या सर्वाइकल कॅन्सर डिव्हाईस (गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी यंत्र ) लोकार्पण सोहळा मा.आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी आमदार श्वेताताई महाले यांनी आरोग्य विषय शासनाच्या सर्व योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यन्त् पोहचविण्यासाठी सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी सक्रीय प्रयत्न करावे तसेच आशा स्वयंसेविका यांनी कर्करोग विषयी जनजागृती करून कर्करोग तपासणी व प्रतिबंध करण्यासाठी सर्वांना प्रवृत्त करावे असे आवाहन केले.
चिखली विधानसभा मतदारसंघाला एक संवेदनशील लोकप्रतिनिधी लाभलेला असून, योगायोगाने चिखली मतदारसंघ, राज्य सरकार, केंद्र सरकार या तीनही ठिकाणी जनहित पाहणारे जनतेचे सरकार असल्याने आणी प्रत्यक्ष मुख्यमंत्री कार्यालयासोबत देखील अतिशय जवळकीचे संबंध असल्याने चिखलीच्या मूलभूत विकासाचे नवीन पर्व सुरु होत आहे. या कामामध्ये शासकीय अधिकारी,कर्मचारी यांनीदेखील जनतेला अधिक चांगली सेवा देता यावी म्हणून अधिक परिश्रम घ्यायला हवे असे कान टोचणी करून आ. महाले यांनी चिखली येथील डायलीसीस सेंटर आणी धाड येथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये अत्यंत चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर त्याची योग्य ती काळजी घेतल्या गेली नसल्याबद्दल खंत सुद्धा व्यक्त केली.
या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भागवत भुसारी यांनी शासनाच्या वतीने सुरू असलेल्या PMJAY/MPJAY NCD या योजना ग्रामीण रुग्णालयात राबविण्या बाबतची माहिती दिली. डॉ.अजबराव वसु स्त्रीरोग तज्ञ यांनी गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी यंत्रामुळे त्वरित निदान व त्यामुळे उपचारात होणारे फायदे याबाबत माहिती दिली. या वेळी IMA अध्यक्ष डॉ रामेश्वर दळवी ,शहर भाजप अध्यक्ष श्री पंडितराव देशमुख,भाजप जिल्हा अध्यक्ष डॉ प्रताप सिंग राजपूत,डॉ वसु,रुग्णालयं समिती सदस्य नामु गुरुदासानी ,विजू नकावल,सुभाष आप्पा मंगरूळकर,पंजाबराव धनवे , युवराज भुसारी यांच्या सह वैद्यकीय अधीक्षक डॉ सैय्यद उमर ,डॉ ए. टी.खान ,डॉ उमेश सावजी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ कणखर,डॉ अमोल राजपूत, डॉ गायकवाड, डॉ विठ्ठल काळूसे,डॉ.राहुल राजपूत,डॉ धनंजय परिहार,डॉ वैभव शिंदे,डॉ साजिद खान,डॉ दीपाली भारसवडकर (जोशी) डॉ प्रीती रिंढे,डॉ आरिफ बेग,डॉ फारुक शेख उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे संचालन डॉ किशोर गवई यांनी केले आभार श्री कैलास गवई यांनी व्यक्त केले



