29 C
New York
Tuesday, August 18, 2026

Buy now

spot_img
spot_img

“कॉपीमुक्त बुलढाणा जिल्हा” साठी तरुण सरसावले.”कॉपिसेंटर चा करणार भांडाफोड”.

“कॉपीमुक्त बुलढाणा जिल्हा” साठी तरुण सरसावले.”कॉपिसेंटर चा करणार भांडाफोड”.

भाईजी यांच्या आवाहणाला तरुणाईचा प्रतिसाद!

बुलढाणा : बुलढाणा अर्बन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष मा. भाईजी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षणव्यवस्था कॉपी या प्रकाराने कशी पोखरून टाकली आहे,याविषयी सुतोवाच केले होते.त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्रातून कॉपी ला हद्दपार करून भावी पिढीला सडण्यापासून वाचवण्याकरिता उपाययोजना कराव्यात अशी विनंतीही केली होती.

ना. प्रतापराव जाधव यांची मंत्रिपदावर निवड व शपथविधी झाल्यानंतर त्यांचा बुलढाणा मध्ये नागरी सत्कार घेण्यात आला,या नागरी सत्काराच्या निमित्ताने बोलतांनाही भाईजींनी हे शल्य समोर मांडले होते.

यातून प्रेरित होऊन बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी फक्त सरकार दरबारीं मागण्या मांडत राहण्याऐवजी प्रत्यक्ष कृतिद्वारे बुलढाणा जिल्हा कॉपीमुक्त करता येईल असा विश्वास व्यक्त करून “कॉपीमुक्त बुलढाणा जिल्हा” हे अभियान राबवण्याचे ठरवले आहे.

या अभियानांतर्गत मा. राधेशाम चांडक यांचे मार्गदर्शन व प्रा. राजेंद्र घोराडे यांच्या नेतृत्वात, स्पर्धा परीक्षा तयारी करणारे अनेक भविष्यातील अधिकारी,एक सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून कॉपिसेंटर म्हणून प्रसिद्ध असलेल्या बुलढाणा जिल्हा व परिसरातील व विशेषतः ग्रामीण भागातील कॉपिसेंटर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कनिष्ठ महाविद्यालय व त्यातील कॉपी पुरवणारे “कलंक शिक्षक” यांचा नावानीशी भांडाफोड करणार आहेत व संबंधित सर्व बाबींची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी व जी. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन ही देणार आहेत.

या पवित्र अभियानामध्ये काही समाजाला कलंक असलेले शिक्षक सोडून,प्रामाणिक शिक्षकांनी आपल्या मुलांना व विद्यार्थ्यांना या समाजविघातक कृत्यातून वाचवण्याकरिता आपल्या मुलांना कॉपिसेंटर असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यापासून रोखावे व आपले सामाजिक योगदान द्यावे,असे आवाहन अभियानप्रमुख प्रा. राजेंद्र घोराडे यांनी केले आहे.

आपल्या अधिनस्थ असलेल्या कॉपिसेंटर ची माहिती 7770087838 या क्रमांकावर तसेच आपल्या भवताली असलेल्या जागरूक पत्रकार यांना देण्याचे आवाहन अभियानातून करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या