25.3 C
New York
Sunday, June 21, 2026

Buy now

spot_img
spot_img

शेळगाव आटोळ ते देऊळगाव घूबे रस्त्याचे सुरु असलेले काम निकृष्ट दर्जाचे…. डॉ. विकास मिसाळ यांचा आंदोलनाचा इशारा.

*शेळगाव आटोळ ते देऊळगाव घूबे रस्त्याचे सुरु असलेले काम निकृष्ट दर्जाचे*

*डॉ. विकास मिसाळ यांच्या तक्रारीनंतर ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष*

शेळगाव आटोळ देऊळगाव घुबे रस्ता रुंदीकरणाचे काम सार्वजानिक बांधकाम विभागाच्या वतीने प्रगती पथावर असून सदर काम हे निकृष्ट दर्जाचे सुरु असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना भ्रमणध्वनी व्दारे लक्षात आणून दिले, त्यानंतर संबंधीत विभागाकडून रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यात आली तेव्हा डॉ विकास मिसाळ यांचे म्हणणे खरे असून रस्ता रुंदीकरण करण्यासाठी आवश्यक तितके खोदकाम करण्यात आले नाही तसेच खोदकाम केलेल्या ठिकाणी कडक मुरूम टाकून दबई करणे आवश्यक होते परंतु तसे न करता अपूर्ण खोदकाम करून कमी जाडीचा गिट्टीचा थर टाकून पाणी न टाकता थाथुर मातुर दबई करण्यात आली असल्याचे सबंधित अधिकारी यांचे लक्षात आल्याने त्यांनी संबंधीत ठेकेदार यांना अंदाज पत्रकाप्रमाणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या परंतु त्यानंतर सुद्धा ठेकेदाराकडून अधिकारी यांचे सूचनेला न जुमानता निकृष्ट दर्जाचे काम सुरूच ठेवण्यात आले आहे त्यामूळे यापुढे जर अशाच प्रकारचे काम सुरू राहिले तर सार्वजानिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात परिसरातील सरपंच यांना सोबत घेऊन ठीय्या आंदोलनं करण्यात येईल असा इशारा डॉ. विकास मिसाळ यांनी सबंधित विभागाला दिला आहे.

एखाद्या जागरूक नागरिकाने रस्त्याच्या गुणवत्तेविषयी आंदोलनापर्यंत जाण्याची तयारी केली त्यामुळे कदाचित कुंभकर्नी झोपेत असलेले सार्वजनिक बांधकाम विभाग हा रस्ता थोडा बरा करा म्हणून संबंधित भ्रष्ट कंत्राटदराला सूचना देईल ही! पण पैशाच्या प्रचंड लोभापायी सरकारी अभियंते जर अशा खराब रस्त्यांना मान्यता देत असतील आणी पैशाच्या हव्यासापायी अशिक्षित,मूर्ख व राजकारण्यांचे पाय चाटणारे ठेकेदार असे रस्ते बनवत असतील त्यांनी किमान  आपल्या पिढीला या रस्त्यावरून जाण्याची गरज पडू नये याची काळजी घ्यायला हवी ! आणी त्यांची पिढी ज्या रस्त्याने जात असेल तो रस्ता यांच्यासारख्याच भ्रष्ट अधिकारी व ठेकेदार यांच्या संगंमताने बनला असेल तर त्यांच्या पिढीचे आयुष्य सुद्धा धोक्यात आहे हे तर कर्म फळाच्या सिद्धांतानुसार त्यांनी लक्षात ठेवायला हवे.

रस्त्याचे टेंडर घेतांना पैसा खाणारे, स्वतःच्या अधिकारात असताना देखील दुसऱ्यांच्या जीवाची पर्वा न करता खराब रस्ता बनवणारे आणी अश्या खराब रस्त्याला पैशासाठी मान्यता देणारे या सर्वांना नरभक्षक राक्षस असेच म्हणता येईल.मुळात लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना यासाठी जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करायला हवेत. अशीच भावना समस्त जनतेची आहे.

Related Articles

ताज्या बातम्या