बुलढाणा: विधानसभा निवडणूक काळात स्वतः व आपल्या समर्थकांना निवडणूक या विषयापासून अलिप्त ठेवत लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या समर्थकांना दाखवलेल्या स्वप्नांना अचानक तडा गेल्यानंतर आता पुढे काय? हा प्रश्न बुलढाणा दर्पणने उपस्थित केल्यानंतर निवडणूक काळात सगळ्या भानगडीपासून अलिप्त व तटस्थ भूमिका ठेवून असणारी क्रांतिकारी शेतकरी संघटना आता निवडणूक होताच शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी दोन पावले पुढे आली आहे. गेल्या वर्षीच्या पिक विम्यापासून वंचित असलेल्या पात्र-अपात्र शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा द्या, या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून आज बुलडाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांसह धडक दिली गेली.
बुलडाणा जिल्ह्यात AIC पिकविमा कंपनीने गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकविम्यापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 235 कोटी 55 लक्ष रु. रक्कम मिळणे अद्याप बाकी आहे. तातडीने ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी .आचारसंहितेमुळे आम्ही शांत होतो, आता आचारसंहिता संपली आहे, त्यामुळे येत्या 8 दिवसांत वंचित पात्र-अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविमा जमा करा, अन्यथा 8 दिवसांनंतर पिकविम्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेमार्फत यावेळी दिला गेला.
यावेळी विनायक सरनाईक, नितीन राजपूत, आकाश माळोदे, अमोल मोरे, रामेश्वर अंभोरे, गजाननबाप्पू देशमूख, राहुल शेलार, महेंद जाधव, उमेशसिंग राजपूत, सदाशिव जाधव सर, भागवत धोरण, विजय बोराडे, गजानन कुटे, सतीश सुरडकर, संतोष शेळके, विशाल पानझाडे, गोपाल चिंचोले, बंडू देशमूख, सुरेश पवार, कडुबा मोरे, अमीन खासाब, मुकिंदा शिंबरे, राहुल बिल्लोरे, श्रीकांत पाटील, गजानन कुऱ्हाडे,रविकांत तूपकर यांच्यासह क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.



